भारतातील अनेक सरकारी विभाग आणि व्यक्ती आता परदेशी ईमेल सेवांऐवजी स्वदेशी पर्याय स्वीकारत आहेत. यामध्ये जीमेलच्या जागी झोहो मेलचा (email)वापर वाढतोय. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्टवरुन आपले झोहो मेल वापरण्याचे जाहीर केले, ज्यामुळे सरकारनेही अप्रत्यक्षपणे झोहो मेलकडे वळण्याचा संदेश दिला आहे.

जीमेलवरून झोहो मेलवर ईमेल (email)ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी प्रथम जीमेलमधील टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय करणे आणि अॅप पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. झोहो मेलच्या अॅडमिन कन्सोलमध्ये IMAP सेटिंगद्वारे जुने ईमेल, कॉन्टॅक्ट्स आणि कॅलेंडर मायग्रेट करता येतात. व्यवसाय किंवा कंपनी खात्यांसाठी zoho.com/mail वर खाते तयार करून डोमेन पडताळणी केली जाते आणि ‘वन क्लिक मायग्रेशन’ निवडून गुगल वर्कस्पेसशी कनेक्ट केले जाते. डेटा रेंज आणि फोल्डर्स निवडल्यानंतर मायग्रेशन सुरू होते.

मोठ्या ईमेलचे शिफ्टिंग पूर्ण होण्यास एक-दोन दिवस लागू शकतात. यासह जुने ईमेल फॉरवर्ड करून नवीन झोहो खात्यावर येणारे ईमेल सहज मिळवता येतात. स्टोरेज व्यवस्थापनासाठी जुन्या ईमेल हटवणे देखील शक्य आहे.झोहो मेलचा वाढता वापर भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाच्या स्वीकाराचा द्योतक आहे. सरकारी विभाग आणि नागरिक यामुळे डिजिटल स्वावलंबनाला चालना मिळत आहे. जीमेलवरून झोहो मेलवर स्थलांतर करण्याची ही प्रक्रिया लोकांसाठी सुलभ मार्ग ठरत असून स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब अधिक सोपा झाला आहे.

हेही वाचा :

सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल

भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 

22 वर्षीय तरुणीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक पडून मृत्यू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *