रतन टाटा यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूपत्राची चर्चा होतेय. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यपत्रात असलेल्या नावांची चांगलीच चर्चा होत होती. त्यातील एका नाव म्हणजे मोहिनी मोहन दत्ता. मोहिनी यांच्या नावे मृत्यूपत्रात मोठी रक्कम लिहिण्यात आली होती. त्यांच्या नावे तब्बल 500 कोटींची(crores) रक्कम करण्यात आली होती. त्यानंतर मोहिनी दत्ता नेमके आहेत तरी कोण? याची चर्चा रंगली होती.

काही वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जमशेदपूरच्या व्यापारी मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. अशावेळी मोहिनी मोहन दत्ता नेमके कोण आणि त्यांना इतकी रक्कम का देण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित होत होते.
मोहिनी मोहन दत्ता रतन टाटा यांना पहिल्यांदा 1960च्या दशकात जमशेदपूरमध्ये भेटले होते होत्या. तेव्हा रतन टाटा 24 वर्षांचे होते व टाटा ग्रुपच्या वेगळ्या वाटा शोधत होते. टाटांच्या भेटीनंतर दत्ता यांचे आयुष्यच बदलून गेले ते त्यांच्या खूप जवळचे मानले जाऊ लागले.
काही रिपोर्टनुसार, दत्ता फक्त त्यांचे सहकारी नव्हते तर ते स्वतःला त्यांचा मानलेला मुलगा देखील मानत होते. ऑक्टोबर 2024 रोजी टाटांच्या अत्यंसंस्कारावेळी दत्ता यांनी म्हटलं होतं की, पहिल्यांदा आम्ही जमशेदपूरमध्ये भेटलो होते. तेव्हा टाटा 24 वर्षांचे होते आणि त्यांनी माझी मदत गेली आणि मला पुढे जाण्यास मदत केली.

दत्ता यांचा व्यापार टाटा ग्रुपसोबत जोडला गेला आहे. ताज ग्रुपसोबत करियर सुरू केल्यानंतर त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीची स्थापना केली. ज्याचा 2013मध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये एक विभाग ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झालं आहे. टाटा कॅपिटलने अधिग्रहण केल्यानंतर ते थॉमस कुकला विकण्याच्या आधी टाटा इंडस्ट्रीजवळ या व्यवसायाची 80 टक्के भागीदारी होती. दत्ता या रीब्रांडेड टीसी ट्रॅव्हल सर्विसेजमध्ये डायरेक्ट होत्या. त्यांच्याकडे टाटा समुहाच्या कंपन्यांचे अनेक शेअर्स आहेत. ज्यात टाटा कॅपिटलदेखील आहे(crores).
हेही वाचा :
महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…
प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, ‘नको तिथे स्पर्श’ करत
भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय