२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षीचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांनी मिळवला आहे. मारिया मचाडो शांतता निर्माण करण्यासाठी आणि जागतिक संघर्ष कमी करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल ओळखल्या जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या वर्षीचा नोबेल (Nobel)शांतता पुरस्कार मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण मारिया मचाडो यांनी या पुरस्कारवर आपले नाव कोरले आहे. जागतिक शांतता, मानवाधिकार आणि संघर्ष निराकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जिंकता आला नाही. युक्रेन युद्ध आणि इतर आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी ट्रम्प यांना नामांकन मिळू शकते अशी बऱ्याच काळापासून शक्यता वर्तवली जात होती, परंतु अखेर ज्युरीने या वर्षीचा पुरस्कार मचाडो यांना देण्याचा निर्णय घेतला.

मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी झाला. त्या व्हेनेझुएलाच्या एका प्रमुख विरोधी नेत्या आणि औद्योगिक अभियंता आहेत. २००२ मध्ये त्यांनी सुमाते या मतदान देखरेख गटाची स्थापना केली आणि व्हेंटे व्हेनेझुएला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. २०११ ते २०१४ पर्यंत त्यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्या म्हणून काम केले. २०१८ मध्ये बीबीसीच्या १०० सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि २०२५ मध्ये टाइम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. निकोलस मादुरो सरकारने त्यांना देश सोडण्यास बंदी घातली. २०२३ मध्ये अपात्र घोषित झाल्यानंतरही, त्यांनी २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवला, परंतु नंतर कोरिना योरिस यांना उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आले.

मारिया कोरिना मचाडो यांनी वाढत्या हुकूमशाही असूनही व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी अद्वितीय धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला आहे. मारिया यांनी अभियांत्रिकी आणि व्यवसायाचा अभ्यास केला आणि काही काळ व्यवसायात काम केले, परंतु त्यांच्यासमोर खरे आव्हान (Nobel)समाज आणि देशाची सेवा करणे हे होते. १९९२ मध्ये,त्यांनी अटेन्सिया फाउंडेशनची स्थापना केली. ही संस्था कराकसच्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे जीवन सुधारण्यासाठी काम करते.

२०१० मध्ये त्यांनी ‘सुमाते’ या संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ही संस्था देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांना प्रोत्साहन देत, नागरिकांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देते. त्याच वर्षी, मारिया मचाडो विक्रमी बहुमताने राष्ट्रीय असेंब्लीवर निवडून आल्या.मात्र, २०१४ मध्ये सत्ताधारी पक्षाने त्यांना पदावरून हटवले. तरीही मचाडो आपल्या तत्त्वांवर ठाम राहिल्या आणि ‘व्हेंटे व्हेनेझुएला’ या विरोधी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. पुढे २०१७ मध्ये त्यांनी ‘सोया व्हेनेझुएला’ युतीची स्थापना केली, जी राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकशाही समर्थक शक्तींना एकत्र आणण्याचे कार्य करते.

हेही वाचा :

शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’

आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!

सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *