सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे शहरात (statement)तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर गोंधळ माजवणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.दोन गटातील राड्यामुळे मिरज शहरात रात्री उशिरा पर्यंत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सध्या शहरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरज शहरातील नदीवेस परिसरातील एका गल्लीत वेगवेगळ्या समाजातील दोन ओळखीचे तरुण रात्री बोलत बसले होते.

बोलत असताना दोघांकडून एकमेकांच्या समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्यामुळे चर्चेचं रुपांतर वादात झालं. यावेळी एका समाजाच्या गटाकडून दुसऱ्या समाजाच्या तरुणास मारहाण करण्यात आली. यानंतर मारहाण झालेला तरुण पळून एका ठिकाणी आश्रय थांपला. मात्र, संतप्त झालेला जमाव त्याच्या घरासमोर जमला.यानंतर संबंधित तरुणावर कारवाई करावी, या मागणीसाठी जमाव मिरज शहर पोलीस ठाण्यात जमला. (statement)त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीही त्या मुलाच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, याचवेळी जमावातील काही जणांनी तेथील राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्यामुळे वाद चिघळला आणि काहीजणांनी पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे (statement)पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे मिरजेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या मिरजेत मोठ्या फौज फाट्यासह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं आहे.दरम्यान, मिरज शहरामध्ये दोन तरुण मुलांमध्ये वादाचा प्रकार घडला मात्र, त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु परिस्थिती नियंत्रणात असून संशयीतांना ताब्यात घेतलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शिवाय अफवा पसरणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा पालीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.
हेही वाचा :
महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…
प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, ‘नको तिथे स्पर्श’ करत
भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय