इचलकरंजी, दि. ८ ऑक्टोबर : इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होऊन सेवा बजावत असलेल्या आणि नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना(employee) चालू आर्थिक वर्षातील दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दाभोळे यांनी सांगितले की, “महानगरपालिकेतील अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी हे गेल्या वर्षभरात मनोभावे व प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. दिवाळी हा आनंदाचा व उत्साहाचा सण असून, या कर्मचाऱ्यांनाही नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान देणे न्याय आहे. यामुळे त्यांच्या मनोबलात वाढ होईल आणि समानतेचा संदेश जाईल.”

त्यांनी पुढे नमूद केले की, महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये हे कर्मचारी(employee) प्रशासनाच्या कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या सर्व अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सध्याच्या आर्थिक वर्षात दिवाळी बोनस तात्काळ मंजूर करावा, अशी त्यांची प्रशासनाकडे मागणी आहे.या मागणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व प्रेरणा निर्माण होईल, असे मत दाभोळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…
प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, ‘नको तिथे स्पर्श’ करत
भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय