भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा(Rohit Sharma) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची जोरदार तयारी करत आहे. तो शिवाजी पार्कवर दररोज नेट्समध्ये घाम गाळत आहे. याच दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा(Rohit Sharma) वनडे संघाचं नेतृत्व करत होता. मात्र, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम मॅनेजमेंटने तरुण शुभमन गिलवर विश्वास ठेवत त्याला कर्णधारपद दिलं आहे. त्यामुळे रोहित आता संघातील सीनियर खेळाडू म्हणून काम पाहणार आहे. पण या बदलाचा रोहितवर अजिबात परिणाम झालेला दिसत नाही. त्याच्या स्वभावातला तो माणुसकीचा गुण पुन्हा एकदा समोर आला आहे.

शिवाजी पार्कवर सराव सुरू असताना रोहितचा एक छोटा फॅन त्याला भेटण्यासाठी आला. पण, त्या मुलाला सिक्युरिटी गार्ड्स आणि काही लोकांनी पुढे जाण्यापासून थांबवलं. हे दृश्य पाहताच रोहितने तत्काळ गार्डवर आवाज चढवला आणि मुलाला भेटण्यास परवानगी दिली. नंतर रोहित स्वतः त्या मुलाला भेटला आणि त्याच्याशी काही क्षण बोललाही. हा प्रसंग पाहून उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि सोशल मीडियावरही या घटनेचं व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला.

रोहितचा हा हृदयस्पर्शी क्षण पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं की, “कॅप्टनसी गेली असेल पण क्लास कायम आहे.” तर काहींनी त्याला “फॅन्ससाठी जगणारा सुपरस्टार” असं म्हटलं.

दरम्यान, रोहित शर्मा आपला लक्ष आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपकडे ठेवून आहे. त्याला अजून एकदा भारतासाठी मोठं टूर्नामेंट जिंकायचं स्वप्न आहे. मात्र, टीम मॅनेजमेंटकडून अजून त्याबाबत कोणतं स्पष्ट संकेत मिळालेलं नाही. वय वाढल्यामुळे रोहित आणि विराट कोहलीला आगामी योजनांमध्ये फारसं स्थान मिळणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. पण हिटमॅनचा जिद्दीपणा पाहता, तो अजूनही हार मानायला तयार नाही!

हेही वाचा :

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी…! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना

‘माझा शारीरिक छळ झाला, सहा महिन्यातच मला…’; मराठी अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *