लग्न झाल्यानंतर मुलींच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलतात आणि त्यांना ते बदल स्वीकारावे लागतात. काही दिवसांनंतर सर्वकाही ठीक होऊन जाईल असं त्यांना सांगितलं जातं, पण जोडीदार चांगला असेल तर गोष्टी सहज सोप्या होतात. मात्र, जर जोडीदार निवडण्यात चूक झाली, तर आयुष्यात पुन्हा ते पाऊल उचलायचे का, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक मुली समोरच्या व्यक्तीला अनेक संधी देतात, ज्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. असेच काही ‘अस्मिता’ फेम अभिनेत्री(actress) मयुरी वाघच्या बाबतीत घडलं आहे.

‘अस्मिता’ मालिकेत काम करत असताना मयुरी वाघची ओळख अभिनेता पियुष रानडेसोबत झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर प्रत्येक मुलगी सुखी संसाराचे स्वप्न पाहते, पण मयुरीच्या बाबतीत असे झाले नाही. सतत होणारा त्रास असह्य झाल्यानंतर अभिनेत्रीने(actress) घटस्फोटाचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर मयुरी वाघने पहिल्यांदाच खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पियुषने अभिनेत्रीचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला, असे तिने म्हटले आहे. यावर मयुरी म्हणाली, ‘माझ्या आईला सकाळी १० वाजेपर्यंत फोन केला नाही तर ती घाबरायची. ती मला विचारायची भांडण झाले आहे का, तू ठीक आहेस ना? आणि एक क्षण आला जेव्हा मला हे सर्व थांबले पाहिजे असे वाटले.’
‘समोरच्या व्यक्तीने माझ्या वडिलांना काही अपशब्द बोलले. ते मला बिलकुल आवडले नाहीत. कारण जोपर्यंत माझ्यापर्यंत होते, तोपर्यंत ठीक होते. आई-वडिलांना माझ्या दुसरं कोणी बोलेल मला सहन होणार नाही. त्याआधी बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या. माझे आई-वडील त्यातून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण मी त्याला संधी देत राहिले.’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सहा महिन्यात मला कळले की माझा लग्नाचा निर्णय चुकला आहे. पण मला ते कळायला आणि स्वीकारायला उशीर झाला.
मुलाखतीदरम्यान, ‘तुझा शारीरिक छळ झाला का?’, असा प्रश्नदेखील अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर मयुरी ‘हो’ म्हणाली. ‘कोरोना काळात मी एकटी असायचे, ज्यामुळे माझ्या आईला खूप काळजी वाटायची,’ असंही मयुरी वाघ नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाली.
हेही वाचा :
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी,
रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी…! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना