भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या(Hardik Pandya) आज 11 ऑक्टोबर 2025 रोजी त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी त्याच्या वाढदिवस तो एका खास व्यक्तीबरोबर साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण त्याचा खेळ नाही, तर त्याचं प्रेम आहे. करवाचौथच्या या शुभ दिवशी हार्दिकने आपल्या नवीन रिलेशनशिपची सार्वजनिक घोषणा करत सर्वांना सरप्राईज दिलं आहे. त्याने मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला, ज्यातून दोघांच्या नात्याची अधिकृत पुष्टी झाली आहे.

या फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका समुद्रकिनाऱ्यावर एकत्र वेळ घालवत आहेत. हार्दिकने माहिकाच्या गळ्यात हात घालून तिला जवळ घेतलं आहे आणि दोघेही स्मितहास्य करत कॅमेऱ्याकडे पाहत आहेत. एकीकडे हार्दिक(Hardik Pandya) काळ्या शर्ट आणि शॉर्ट्समध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसतोय, तर माहिका पांढऱ्या शर्टमध्ये साधेपणातही अतिशय सुंदर दिसतेय. आणखी एका फोटोमध्ये दोघे हातात हात धरून चालताना दिसतात, ज्यामुळे त्यांच्या नात्याची गोडी स्पष्ट होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक आणि माहिका एकमेकांना गेल्या काही महिन्यांपासून डेट करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी आपलं नातं पब्लिकमध्ये कधीही उघड केलं नव्हतं. काही आठवड्यांपूर्वी या दोघांना मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहण्यात आलं होतं, आणि त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चाहत्यांनी तेव्हापासूनच अंदाज लावायला सुरुवात केली होती की हार्दिकच्या आयुष्यात कुणीतरी खास आली आहे. आता करवाचौथच्या दिवशी त्याने ती गोष्ट स्वतः मान्य केली आहे.
काही काळापूर्वी हार्दिकचं नाव मॉडेल आणि सिंगर जैस्मिन वालिया सोबतही जोडलं गेलं होतं, मात्र तो फक्त अफवा असल्याचं पुढे स्पष्ट झालं. त्याआधी, सर्वांना माहित आहेच की हार्दिकने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केलं होतं. या दोघांचं लग्न चार वर्षं टिकलं आणि त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. परंतु, गेल्या वर्षी दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतल्याचं समोर आलं.
नताशापासून वेगळं झाल्यानंतर हार्दिक काही काळ सोशल मीडियापासून दूर राहिला होता. पण आता असं दिसतं की तो पुन्हा आपल्या आयुष्यात पुढे जाण्यास तयार झाला आहे. माहिका शर्मा सोबत त्याचं नातं त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक मोठं सरप्राईज ठरलं आहे.
माहिका शर्मा ही भारतातील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं आहे आणि विविध फॅशन ब्रँड्ससाठी शूट केलं आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि ती फॅशन, ब्युटी आणि फिटनेसशी संबंधित कंटेंट शेअर करत असते. माहिकाचा आत्मविश्वास, स्टाईल आणि ग्लॅमरस पर्सनॅलिटीमुळे ती तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
करवाचौथच्या या रोमँटिक दिवशी हार्दिक आणि माहिकाने आपल्या नात्याची कबुली देत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. क्रिकेट फॅन्स आणि सोशल मीडियावर या नव्या कपलबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या जोडीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता सर्वांच्या नजरा हार्दिक आणि माहिकाच्या या नव्या प्रवासाकडे लागल्या आहेत पाहूया हे नातं किती लांबपर्यंत जातं!
हेही वाचा :
रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी…! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना
‘माझा शारीरिक छळ झाला, सहा महिन्यातच मला…’; मराठी अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा