कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा (couple) दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांमध्ये भीती आणि हळहळ निर्माण झाली आहे. निनू यशवंत कंक (वय 75) आणि रखुबाई निनू कंक (वय 70) हे गोलीवणे धनगरवाडा येथील रहिवासी होते. हे दाम्पत्याचा रोजप्रमाणे शनिवारी परळीनिनाई धरणाच्या बॅकवॉटर परिसरात शेळ्या चरण्यासाठी गेले होते.

मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे गावकऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली. पहाटेच्या सुमारास रखुबाई यांच्या शरीराचे काही तुकडे झुडपात सापडले, तर निनू कंक यांचा(couple) मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळला. शेळ्याही गायब होत्या, आणि मृतदेहावरील जखमांवरून हा बिबट्याचा हल्ला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि शाहूवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. परळीनिनाई परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हालचाली वाढल्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. तरीही योग्य उपाययोजना न झाल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. “बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

परळीनिनाई हा डोंगर, झाडी आणि धरण परिसराने वेढलेला भाग असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र दिवाळीसारख्या सणाच्या काळात अशी दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. मेहनती आणि कष्टकरी कंक दाम्पत्याचा निधनाने गोलीवणे आणि परिसरातील गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
पुढच्या वर्षी सोनं किती महागणार? काय असेल रेट? बाबा वेंगाची थक्क करणारी भविष्यवाणी काय?
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार…