प्रेम म्हणावं की वेडेपणा! लेकीच्या शाळेची फी भरली नाही पण धोनीला पाहण्यासाठी केला 64 हजारांचा खर्च
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला फॅन्सने(fees) भरभरून प्रेम दिलं. आयपीएलमुळे धोनीची प्रतिमा चांगलीच उंचावली. सुरूवातीपासून चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधीत्व करणारा धोनी डेथ ओव्हरमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रसिद्ध झाला. तर थालाची कॅप्टन्सी देखील वर्ल्ड कपनंतर फेमस झाली. धोनीचे निर्णय सटीक असतात, असं काही फॅन्सचं म्हणणं आहे.
तर धोनी मेहनती खेळाडूंचं क्रेडिट घेतो, असा आरोप देखील काही फॅन्स(fees) करतात. मात्र, धोनीची लोकप्रियता कमी झाली नाही. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलच्या माध्यमातून धोनी चाहत्यांचं मनोरंजन करतो. त्यामुळे धोनीला खेळताना पाहण्याची संधी चाहते सोडत नाहीत. अशातच आता धोनीच्या एका चाहत्याने कहरच केलाय.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनल्यानंतर चेन्नईसह दक्षिण भारतात धोनीच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाल्याचं दिसून आलं. धोनीला एकदा तरी मैदानात खेळताना पहावं, अशी इच्छा प्रत्येक थाला फॅन्सची असते. अशातच आता एका चाहत्याने धोनीला पाहण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलं. झालं असं की, 8 एप्रिल रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला गेला होता. त्या सामन्यात धोनीची झलक पाहण्यासाठी एका चाहत्याने ब्लॅकने तिकीट खरेदी करत तब्बल 64 हजारांचा खर्च केला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक फॅन तमिळमध्ये बोलताना दिसतोय. मला तिकीट मिळाले नाही. म्हणून मी ब्लॅकने तिकीट खरेदी केलं. त्याची किंमत 64 हजार होती. मी अजूनही माझ्या मुलीच्या शाळेची फी भरली नाही. पण आम्हाला धोनीला खेळताना पहायचं होतं.
त्यामुळे मी तिकीट खरेदी केलं. मी आणि माझ्या तिन्ही मुली आनंदी आहोत, असं हा व्हायरल व्हिडीओमध्ये फॅन बोलताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्या मुलीने देखील या गोष्टीला दुजोरा दिला. माझ्या वडिलांनी तिकीट काढण्यासाठी खूप कष्ट केले. धोनी खेळायला आला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, असं ती मुलगी म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, कोलकाताविरुद्धच्या सामन्यात थाला धोनीची क्रेझ पुन्हा एकदा चेपॉकवर पहायला मिळाली. अखेरच्या तीन धावा हव्या असताना चेपॉकवर धोनीला बॅटिंगला पाठवा म्हणून जोरदार मागणी झाली. अखेरीस तीन धावांची गरज असताना जडेजा मैदानात येण्यासाठी निघाला अन् चाहत्यांनी एकच कल्ला केला. जडेजाला दोन पाऊलं चालला अन् थेट माघारी फिरला. जडेजाने प्रेक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. जडेजा ही धमाल पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आलं नाही.
हेही वाचा :
राहुल गांधींची मोठी घोषणा; महिलांच्या खात्यात महिन्याला जमा करणार 8500 रुपये
हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
ठरलं! लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतच्या विरोधात उभा राहणार काँग्रेसचा ‘हा’ नेता