पुण्यातील पेशव्यांचे वैभवाचे प्रतिक असलेल्या शनिवार वाड्यातील(Shaniwarwada) धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये मुस्लीम महिला नमाज पठन करताना व्हिडिओ शेअर केला. यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मेधा कुलकर्णींकडून हाती भगवा घेत शनिवार वाड्याचे शुद्धीकरण देखील केले.

ऐतिहासिक शनिवारवाड्यात (Shaniwarwada)काही मुस्लिम महिलांनी सामूहिक नमाज पठण केले. बुराख्यामध्ये नमाज पठन करण्याचा सदर व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या विरोधात काल काही संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.दरम्यान याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. यानंतर आता मेधा कुलकर्णींकडून शनिवार वाड्याचे शुद्धीकरण देखील करण्यात आले.
शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांर्गत येणारी वास्तू आहे. या प्रकरणी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री तक्रार केली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. मात्र याविरोधात मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या की, “ठिकठिकाणी अशा प्रकारे जमिनी काबीज करणं सुरु आहे. आमची भूमिका ही आहे की कुठल्याही प्रकारे असं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. नमाज पढतात आणि नंतर ती जागा वक्फची म्हणून घोषित करतात. देशद्रोही कारभार चालतो. आमचा अशा कुठल्याही गोष्टीला विरोध आहे. असं कुठलही कारस्थान खपवून घेणार नाही. यासाठी हिंदू समाज जागृत झालेला आहे. आम्ही ती जागा पवित्र केली, अशी भूमिका भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी घेतली.
पुढे त्या म्हणाल्या की, “शनिवारवाडा(Shaniwarwada) जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या हिंदवी स्वराज्याचा, मराठा सम्राज्याचा विस्तार ज्या ठिकाणहून झाला. त्याचं केंद्र स्थान असलेला शनिवारवाडा आमच्यासाठी ऐतिहासिक भूषण आहे. अशा ठिकाणी मुस्लिमांच्या काही गटांनी काही मुस्लिम महिलांनी प्रामुख्याने या ठिकाणी शुक्रवारी नमाज पठण केल्याच लक्षात आलंय. गळीकडे अशा घटना घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत ते माहित आहे. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
हेही वाचा :
लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती..
एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन…
कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…