भारतीय संघाकडून पदार्पणात इतिहास रचणारा आणि जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (cricketer)ठरलेला परवेझ रसूल यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३६ वर्षीय रसूल यांनी बीसीसीआयला अधिकृतपणे आपल्या निर्णयाची माहिती दिली. १७ वर्षांच्या दीर्घ प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांनी ३५२ विकेट्स आणि ५६४८ धावा करून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली छाप सोडली.

२०१४ मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध त्यांनी वनडेत पदार्पण केले, तर २०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळला, जो त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०१२-१३ हंगामात ५९४ धावा आणि ३३ विकेट्स घेत त्यांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
याच कामगिरीमुळे त्यांना टीम इंडियात स्थान मिळाले आणि नंतर IPL मध्ये पुणे वॉरियर्सच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. जरी IPL मध्ये ११ सामन्यांत केवळ ४ विकेट्स मिळाल्या, तरी जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी(cricketer) त्यांचे योगदान आणि प्रेरणादायी प्रवास क्रिकेट इतिहासात कायम स्मरणात राहतील.
हेही वाचा :
पतीसमोरच 7 जणांकडून गँगरेप, अन्… पुढे जे घडलं ते धक्कादायक…
शनिवारवाड्यातील नमाज पठनामुळे पुण्यातील वातावरण तापलं! मेधा कुलकर्णींकडून हाती भगवा घेत शुद्धीकरण
लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती..