संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या उत्सवात रंगला आहे. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सचा धडाका – सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. आजकाल कोणताही सण आला की सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. यंदाची दिवाळीही त्याला अपवाद नाही. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर दिवाळीच्या शुभेच्छा, फोटो आणि खास सजावटीचे व्हिडिओ (chillies)सर्वत्र पसरले आहेत.

याचदरम्यान, एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खूपच वेगळी आणि कल्पक सजावट करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण दिवाळीच्या वेळी लायटिंगसाठी लडी वापरतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण या व्यक्तीने या पारंपरिक लायटींगमध्ये असा ट्विस्ट दिला की लोक पाहून आश्चर्यचकित झाले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती हिरव्या आणि लाल मिरच्या कापत आहे. सुरुवातीला काहीच समजत नाही की मिरच्या(chillies) आणि दिवाळी लायटिंगचा काय संबंध? पण लगेचच लक्षात येतं की तो या मिरच्या लायटिंगच्या बल्बवर बसवल्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा लाइट सुरू होतात, तेव्हा त्या मिरच्या झगमगायला लागतात. त्याची ही एकदम हटके आणि विनोदी सजावट पाहून लोक आता चांगलेच अचंबित झाले आहेत. युजर्सना हा जुगाड भारीच आवडला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, कोणी म्हणतंय “हेच खरं देसी डेकोरेशन,” तर कोणी हसून हसून लोटपोट होत आहे.
India Is Not For Beginners 😎😎😎
— Shabaz khan (@MohhamdShabaz) October 20, 2025
Indian Day By Day 📈
🇺🇸America क्या कहता था…..???? pic.twitter.com/0gsTkjw1CS
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @hhamdShabaz नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जुगाडच्या बाबतीत भारताचा कोणी हात पकडू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भारी आहे हे” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “देसी जुगाड”.
हेही वाचा :
35 वर्षांची वहिनी 19 वर्षाच्या दीराच्या प्रेमात,मग जंगलात जाऊन तिथे…
२० रुपयांच्या ‘या’ पदार्थामुळे होतील काळेभोर सुंदर केस
गृहिणींसाठी पोस्ट ऑफिसची योजना; एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा हमखास मिळेल उत्पन्न