कोल्हापूर – राधानगरी मार्गावरील कौलव (ता. राधानगरी) येथे मंगळवारी (दि. २१) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे(accident) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरसंबळे (ता. राधानगरी) येथील श्रीकांत बाबासाहेब कांबळे (वय ३०) आणि त्यांची बहीण दिपाली गुरुनाथ कांबळे (वय २५, मुळगाव शेंडूर, ता. कागल) हे दोघे भोगावती येथून तरसंबळे कडे मोटरसायकलवरून जात होते. त्यांच्यासोबत श्रीकांत यांची अडीच वर्षांची मुलगी कौशिकी आणि आठ वर्षांचा मुलगा अथर्व सचिन कांबळे हे देखील होते.

दरम्यान, कौलव येथील दत्त मंदिराजवळ समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो (क्र. एमएच 14 डीएम 9836) चा चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की श्रीकांत आणि त्यांच्या मुली कौशिकीचा जागीच मृत्यू झाला, तर दिपाली कांबळे उपचाराअभावी रस्त्यातच मरण पावल्या. अथर्व कांबळे गंभीर जखमी असून त्याला तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत श्रीकांत कांबळे हे पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, फक्त पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचे निधन झाले होते, त्यामुळे ते गावी आले होते. दिपाली कांबळे यांच्या पतीचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्या तेव्हापासून भावासोबतच राहत होत्या.या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली, नातेवाईकांचा आक्रोश उसळला. संतप्त जमावाने टेम्पोच्या (accident)काचा फोडल्या. अपघातानंतर चालक पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा :

१० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा,

Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! 

भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *