भाऊबीजेनिमित्त तुम्ही लाडक्या भावासाठी इन्स्टंट पेढे (pedhe)बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय तुम्ही बनवलेले पेढे सगळ्यांचं खूप जास्त आवडतील.

दिवाळीमध्ये येणाऱ्या सर्वच सणांना विशेष महत्व आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज हे सण साजरा केला जातो. सणाच्या दिवशी घरात फराळ आणि मिठाईतील पदार्थ (pedhe)विकत आणले जातात. पण सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाई बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये इन्स्टंट पेढा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरात कोणत्याही सणाच्या दिवशी पेढे आवर्जून आणले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे बाजारातील विकतची मिठाई आणण्यापेक्षा घरी बनवलेली मिठाई खावी. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पेढा हा पारंपरिक पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया कमीत कमी साहित्यात इन्स्टंट पेढा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

तूप
दूध
मिल्क पावडर
कंडेन्स मिल्क
सुका मेवा

कृती:

इन्स्टंट पेढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात तूप टाका. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर दूध घालून व्यवस्थित मिक्स करा.

पॅनमध्ये दूध घातल्यानंतर चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे पदार्थ कढईला किंवा पॅनल चिकटणार नाही.

दूध आटल्यानंतर त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

यामुळे हळूहळू मिश्रण हट्ट होण्यास सुरुवात होईल. पेढे बनवताना गॅस कायमच मंद आचेवर ठेवावा. अन्यथा पदार्थ करपण्याची शक्यता असते.

घट्ट झालेला दुधाचा गोळा वाटीमध्ये काढून छोट्या छोट्या आकाराचे पेढे बनवून वरून सुका मेवा टाका.

तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले इन्स्टंट पेढे. हा पदार्थ तोंडात टाकताच सहज विरघळून जाईल.

हेही वाचा :

श्रीमंत माणसं अंघोळीसाठी वापरतात

Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास…! 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *