एचडीएफसी बँकेच्या (Bank)ग्राहकांसाठी चेक व्यवहारांबाबत महत्त्वपूर्ण बदल लागू होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांमुळे, चेक क्लिअरन्सची प्रक्रिया आता अधिक वेगवान होणार आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून हा बदल अमलात येत असून, यामुळे ग्राहकांना काही नवीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, अन्यथा त्यांना चेक बाउन्ससारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने चेक वटवण्याच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. पूर्वी वापरात असलेली ‘बॅच क्लिअरिंग’ पद्धत आता बंद होणार असून, त्याऐवजी ‘सतत क्लिअरिंग आणि सेटलमेंट’ प्रणाली ४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू केली जात आहे. यामुळे चेक बँकेत जमा केल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी लागणारा एक ते दोन दिवसांचा वेळ आता वाचणार आहे.
नवीन प्रणालीनुसार, बँकांमध्ये (Bank)दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चेक स्वीकारण्याचे एकच सत्र असेल. या काळात प्राप्त झालेले चेक बँका स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसकडे सातत्याने पाठवतील. ज्या बँकेचा चेक आहे, ती बँक त्वरित तपासणी करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करेल. यामुळे चेक जमा केल्याच्या दिवशीच, काही तासांत क्लिअर होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
या नवीन आणि जलद क्लिअरिंग सुविधेमुळे बँक खातेधारकांना आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. चेक बँकेत क्लिअरिंगसाठी सादर होईल, त्याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम असणे अत्यावश्यक असेल. पूर्वी चेक क्लिअर होण्यासाठी वेळ लागत असल्याने खात्यात पैसे जमा करण्यासाठी थोडा अवधी मिळत असे, तो आता मिळणार नाही.

जर चेक सादर झाला आणि खात्यात पुरेशी रक्कम नसेल, तर चेक बाउन्स होण्याची शक्यता वाढणार आहे. यामुळे नाहक भुर्दंड आणि कायदेशीर अडचणी येऊ शकतात. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, या प्रणालीचा दुसरा टप्पा ३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेक जारी करताना किंवा स्वीकारताना खात्यातील शिल्लक रकमेची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा :
पत्नीसोबत बाथरूममध्ये….माजी डीजीपीच्या मुलाचे झोप उडवणारे दोन VIDEO…
दररोज सकाळी करा ‘ही’ ३ कामं, कधीच पैसे कमी पडणार नाही..
20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू..