राजस्थानमधील कोटा येथेही कफ सिरपने आणखी एकाचा जीव घेतलाय. (drinking)आता कोणी लहान मुलगा नाही तर एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. खोकला आणि सर्दी झाल्यानंतर महिलेने कप सिरपचं सेवन केलं होतं. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती महिलेच्या मुलाने माध्यमांना दिलीय.कोटा शहरातील अनंतपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. अजय आहुजा नगरमध्ये मृत महिला राहत होती. मागील रविवारी ही घटना घडली होती. ५५ वर्षीय कमला देवी यांच्या मुलाने आरोप केला की, त्यांच्या आईला खोकला आणि सर्दी झाली होती. त्यामुळे त्यांनी कफ सिरप घेतलं. पण सिरप प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी जास्त बिघडू लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत महिलेचा मुलगा म्हणाला की, त्यांची आई दिवाळीसाठी साफसफाई करण्यात व्यस्त होत्या. (drinking)याच दरम्यान तिला सर्दी झाली. आईची तब्येत बिघडल्यावर रंगबारी परिसरातील नगर मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप आणले. दोन चमचे सिरप घेतल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी आणि इतर चाचण्या केल्या.

डॉक्टरांच्या मते, महिलेच्या हृदयाचे ठोके खूप कमी होते.(drinking) उपचार सुरू करण्यात आले. पण निम्म रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसआय रोहित कुमार यांनी सांगितलं की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांनाकडे सोपवण्यात आलंय.

हेही वाचा :

आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…

ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…

तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *