आजकाल स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक क्षण टिपून जगासमोर मांडणं सहज शक्य झालं आहे. या डिजिटल काळात लोक वेगवेगळे व्हिडिओ शूट करत असतात आणि त्यातून काही आश्चर्यचकित करणारे, काही हसवणारे, तर काही विचार करायला लावणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात एका परदेशी (Foreign)महिलेने बिकिनी घालून गंगेत आंघोळ केल्याचे दिसून आले.

व्हिडिओमध्ये ती परदेशी महिला बिकिनी घालून दिसत आहे. तिच्या गळ्यात फुलांच्या माळा आहेत, कपाळावर हळदी-कुंकुवाचा लेप लावलेला आहे आणि डोळ्यांवर गॉगल आहे. ती “ॐ नमः शिवाय” आणि “गंगा मैया की जय” असा जयघोष करत गंगेच्या पवित्र पाण्यात उतरते. नदीत उतरल्यानंतर ती आपल्याजवळील(Foreign) माळा पाण्यात अर्पण करते आणि मग डुबकी मारते. काही वेळ पोहल्यावर ती नदीबाहेर येते.

या व्हिडिओवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या श्रद्धेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिच्या पोशाखावर टीका केली आहे. एका युजरने लिहिलं, “यात काहीच वावगं नाही, श्रद्धा प्रत्येकाची वेगळी असते.” दुसऱ्या युजरने थट्टेच्या सुरात म्हटलं, “मीही अंडरवेअर घालून आंघोळ केली आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “तिचा हेतू चुकीचा नव्हता.” सर्वांच्या प्रतिक्रिया सारख्या नाहीत, काही लोकांनी तिच्यावर टीका करत लिहिलं, “तिने परंपरांचं उल्लंघन केलं आहे आणि कोणीही काही बोलत नाही, हेच आश्चर्य.” आणखी एका युजर्सने नमूद केलं, “भावना समजल्या पण बिकिनी योग्य नव्हती.”

हा व्हायरल व्हिडिओ @comedyculture.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या घटनेवरून स्पष्ट होतं की, श्रद्धा, परंपरा आणि आधुनिकता यातील समतोल कसा राखावा, हा प्रश्न लोकांना कायम भेडसावत आहे. या व्हिडिओमुळे जरी चर्चेला उधाण आलं असलं, तरी श्रद्धेच्या अभिव्यक्तीचा प्रत्येकाला अधिकार आहे, हेही विसरून चालणार नाही.

हेही वाचा :

पत्नीसोबत बाथरूममध्ये….माजी डीजीपीच्या मुलाचे झोप उडवणारे दोन VIDEO…

दररोज सकाळी करा ‘ही’ ३ कामं, कधीच पैसे कमी पडणार नाही..

20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *