राज्यात उकाड्याचा ताप कायम असताना पावसाची उघडीपही सुरु आहे. (important)हवामान विभागाने आज मुंबईसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने ऐन दिवाळीत पावसाचं सावट आहे. काल मुंबईतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर कोकणातही पावसाने काल दमदार बॅटिंग केल्याचं पाहिला मिळालं.महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्रतेने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना तापदायक ठरत आहे.

ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावलेल्या भागात उन्हाचा चटका कमी होता. (important)किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे ३५ अंश सेल्सिअस, रत्नागिरी, ब्रह्मपुरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर अकोला, जळगाव, अमरावती, डहाणू येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.सलग दोन दिवस पावसाने संद्याकाळच्या सुमारास हजेरी लावली आहे.(important) पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम,अकोला या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून तीव्र उकाडा असलेल्या जिल्ह्यांना तुरळक प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (important)मात्र ऐन सणासुदीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…
ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…
तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरल