महायुती सरकारने(government) सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची माहिती समोर आली आहे. यंदा लाडक्या बहिणींना भाऊबीजपूर्वीच खूशखबर मिळणार आहे. लाभार्थी बहिणींची पडताळणी ई-केवायसीद्वारे आधार कार्डवरून करण्यात येत असून, महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे. मात्र सध्या ई-केवायसीची प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

योजनेच्या लाभार्थी बहिणींना https://ladakibahin.maharashtra.gov.in
या अधिकृत पोर्टलवर जाऊन e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित व पारदर्शक असून भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.
e-KYC प्रक्रियेची सोपी स्टेप्स:
https://ladakibahin.maharashtra.gov.in
या वेबसाईटला भेट द्या.
‘e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा’ या पर्यायावर क्लिक करा. नवीन वेबपेज उघडेल.
लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवा. कॅप्चा नोंदवताना काळजी घ्या.
आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
ओटीपी प्राप्त करून प्रमाणीकरण पूर्ण करा.

महिला व बालविकास विभागाने सर्व लाभार्थींना विनंती केली आहे की, e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, जेणेकरून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात(government) सुरळीत जमा होईल.या योजनेमुळे महिला सक्षमीकरणासह घरगुती समृद्धीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ; चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतके’ रूपये
कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!
नवऱ्याच्या अफेअरचा बदला,बायकोने गुप्तांगावर उकळतं पाणी व अॅसिड ओतलं..