ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताचा(disappointed) स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यातही खाते न उघडता आल्याने त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच, बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटने हात उंचावून चाहत्यांचे केलेले अभिवादन चर्चेचा विषय ठरले असून, त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर सातव्या षटकात विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. ॲडलेडचे मैदान हे कोहलीच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे, जिथे त्याने यापूर्वी चार डावांमध्ये दोन शतके झळकावली होती. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.

मात्र, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने त्याला खाते उघडण्याचीही संधी दिली नाही. बार्टलेटने एकाच षटकात आधी गिलला आणि नंतर कोहलीला शून्यावर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.(disappointed) सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाल्याने कोहलीच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्ट दिसत होती.कोहली बाद होऊन पॅव्हेलियनकडे परत जात असताना त्याने अचानक हात उंचावून मैदानातील प्रेक्षकांचे अभिवादन केले. मान खाली घालून परतणाऱ्या कोहलीच्या या कृतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियातील चाहतेही त्याची फलंदाजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोहलीने केलेले हे अभिवादन म्हणजे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत आहेत का, अशी चर्चा तात्काळ सोशल मीडियावर सुरू झाली.

विराटची तंदुरुस्ती आजही वाखाणण्याजोगी असली तरी, त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटलाही अलविदा म्हणेल, असा अंदाज आधीपासूनच वर्तवला जात होता. (disappointed)आता त्याच्या या कृतीने त्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. सामन्यात भारताकडून रोहित शर्माने ७३ आणि श्रेयस अय्यरने ६१ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने ४ आणि बार्टलेटने ३ गडी बाद केले.
हेही वाचा :
आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…
ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…
तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरलEdit