आपल्या घरात रोजच्या वापरातील सर्वात महत्त्वाचं उपकरण म्हणजे फ्रिज.(fridge)पण बऱ्याचदा आपण त्याची योग्य काळजी घेत नाही. फ्रिजच्या आत बर्फाचा थर जास्त झाला की त्याचा परिणाम थेट कूलिंग आणि वीजखर्चावर होतो. म्हणूनच फ्रिजला वेळोवेळी डीफ्रॉस्ट करणं खूप गरजेचं आहे. चला जाणून घेऊया किती दिवसांनी डीफ्रॉस्ट करावं आणि न केल्यास काय धोका होऊ शकतो.डीफ्रॉस्ट म्हणजे फ्रिजच्या आत जमा झालेला बर्फ वितळवून स्वच्छ करणे. फ्रिज वापरताना आतल्या भागात ओलावा साचतो आणि तो बर्फामध्ये बदलतो. हा बर्फ जसजसा वाढत जातो, तसतसं थंड हवेचा प्रवाह कमी होतो आणि फ्रिजचं कूलिंग कमी पडू लागतं.जर तुमच्याकडे सिंगल डोअर मॅन्युअल फ्रिज असेल, तर दर 5 ते 7 दिवसांनी डीफ्रॉस्ट करणं आवश्यक आहे. डबल डोअर किंवा फ्रोस्ट-फ्री फ्रिज असल्यास, महिन्यातून एकदा तरी डीफ्रॉस्ट करणं योग्य राहील.

जास्त वापर होत असल्यास उन्हाळ्यात किंवा मोठ्या कुटुंबात, दर 3–4 दिवसांनी हलकं डीफ्रॉस्ट करणं चांगलं.कूलिंग कमी होतं: बर्फाचं थर जास्त झाल्यास थंड हवा नीट फिरत नाही. (fridge)कंप्रेसरवर ताण येतो: थंड ठेवण्यासाठी मशीनला जास्त मेहनत करावी लागते. वीजबिल वाढतं: फ्रिज जास्त वेळ चालू राहतो, त्यामुळे वीजेचा वापर वाढतो. खाद्यपदार्थ लवकर खराब होतात: योग्य तापमान न मिळाल्याने अन्न टिकत नाही. फ्रिजचं आयुष्य कमी होतं: सतत ताणामुळे त्याचे भाग खराब होऊ शकतात.

सर्वप्रथम फ्रिजचा प्लग काढा. फ्रिजमधील सर्व वस्तू बाहेर काढा.(fridge) फ्रिजचं दार उघडं ठेवा आणि बर्फ नैसर्गिकरीत्या वितळू द्या. गरम पाणी किंवा तीक्ष्ण वस्तू वापरू नका, त्यामुळे फ्रिजच्या आतल्या भिंतींना नुकसान होऊ शकतं. बर्फ वितळल्यानंतर आतला भाग कोरडा करून पुन्हा फ्रिज सुरू करा.डीफ्रॉस्ट केल्यानंतर फ्रिजचं तापमान लगेच सर्वात कमी कूलिंग मोडवर ठेवू नका. त्याऐवजी 15–20 मिनिटांनंतर मध्यम तापमानावर सुरू करा. त्यामुळे फ्रिजच्या कंप्रेसरला अचानक ताण येत नाही आणि तो जास्त कार्यक्षमतेने थंड करतो.
हेही वाचा :
भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड
खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून
नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण