इचलकरंजी महापालिकेच्या महापौरपदाच्या दहा महिन्यांचा फॉर्म्युला बदलण्याची चिन्हे आहेत.(Changes)त्याऐवजी सव्वा वर्षाचा कालावधी करण्याबाबत भाजपकडून हालचाली होण्याची शक्यता आह पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पाच वर्षांत सहाऐवजी फक्त चौघांनाच महापौर पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महापालिका निडवणुकीत भाजपने बहुमत प्राप्त केले आहे.(Changes) त्यानुसार ९ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर निवड होणार आहे. त्यासाठी सहा फेब्रुवारीला नामनिर्देशीत पत्र सादर करण्यासाठी मुदत आहे.महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांवर जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्यासाठी दहा-दहा महिन्यांचा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. पण, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
या दोन्ही पदांवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी किमान(Changes) सव्वा वर्षाचा कालावधी करण्याच्या सूचना पक्षाला वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा महिन्यांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता आहे. जर सव्वा वर्षाचा कालावधी केला, तर पाच वर्षांत प्रत्येकी चौघांना महापौर-उपमहापौर पदावर संधी मिळणार आहे.महापौरपदासाठी तीन नावे भाजप पक्षाकडून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून त्यातील एका नावाला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. त्यामुळे तीनमध्ये आपले नाव जाण्यासाठी इच्छुकांनी आजपासूनच नेतेमंडळींकडे फिल्डिंग लावली आहे.
हेही वाचा :
एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग