जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. केवळ २५ वर्षीय होतकरू अभिनेता(Marathi actor) आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर सचिन गणेश चांदवडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन हा पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता, तसेच अभिनय क्षेत्रातही आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने गावात आणि सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनने राहत्या घरात गळफास घेतला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीड वाजता त्याचा मृत्यू झाला(Marathi actor). सचिनला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्याने पुणे आणि मुंबईत काही चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. ‘असुरवन’ या आगामी चित्रपटात तो झळकणार होता, ज्याचं पोस्टर त्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केलं होतं. तसेच तो ‘जमतारा सीझन २’ आणि ‘विषय क्लोज’ या चित्रपटांतही दिसला होता.

सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, अभिनय आणि ढोल-ताशा पथकातील सक्रिय सहभाग या तिन्ही क्षेत्रांमध्ये सचिनने आपली छाप पाडली होती. त्याच्या आत्महत्येमुळे केवळ त्याचे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव आणि मनोरंजन क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ
AI मंत्री डिएला झाली ‘गर्भवती’; एकाचवेळी ८३ मुलांना देणार जन्म…
एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर….