लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना संपण्यास आता अवघे काही दिवस उरले असतानाही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. मात्र, राज्य सरकारकडून लवकरच याबाबत सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच महिलांच्या खात्यात हप्ता जमा (deposited)होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ (deposited)शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात अपेक्षित आहे, आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही. त्यामुळेच सरकार निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. मात्र, सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर केवायसीला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांपर्यंत ही प्रक्रिया स्थगित राहणार असून, परिस्थिती स्थिर झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येईल.राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना येत्या काही दिवसांतच दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा :
Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार….
सर्व बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी….
कचरागाडी आणि कारच्या मध्ये जाऊन चिरडले गेले दोन मजूर; Video Viral..