मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आयुष्यभराच्या जोडीदाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने नवरी विकत घेऊन लग्न केले, मात्र लग्नानंतर समजले की ती मुलगी नसून तृतीयपंथी आहे. या घटनेमुळे नवरदेव(husband) व त्याच्या कुटुंबावर अक्षरशः संकट कोसळले असून संपूर्ण गावात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूरमधील एका गावात शुकरू अहिरवार नावाचे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या मुलाचे लग्न काही केल्या जमत नव्हते. अशातच एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की छत्तीसगडहून एक मुलगी मिळू शकते, मात्र त्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागतील. आर्थिक अडचणी असूनही मुलाचे लग्न व्हावे म्हणून शुकरूंनी तीन एकर जमीन गहाण ठेवून पैसे जमवले. याशिवाय लग्नात आणखी ८० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.

लग्न पार पडले, पण लग्नानंतरपासूनच नवरी नवऱ्यापासून (husband)अंतर राखून होती. यामुळे संशय निर्माण झाला. अखेर नवरदेवाला समजले की त्याची नवरी प्रत्यक्षात तृतीयपंथी आहे. ही बाब समोर आल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरले, मात्र बदनामीच्या भीतीने कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांतच ती नवरी घर सोडून निघून गेली आणि गावाच्या मागील डोंगरावर लपून बसली.

गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. नवरीला रुग्णालयात नेल्यावर ती प्रत्यक्षात तृतीयपंथी असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. या उघडकीनंतर गावात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.शुकरू अहिरवार यांनी माध्यमांना सांगितले की, “मुलाच्या लग्नासाठी आम्ही जमीन गहाण ठेवली, पण आमच्याच विश्वासाला तडा गेला. आता समाजात आमची बदनामी झाली आहे.” या घटनेनंतर परिसरात विवाहांमधील दलाल आणि फसवणूक करणाऱ्या टोळ्यांबाबत पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण…

 नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? 

१ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *