नोव्हेंबर महिन्यात बँकिंगची(banks) कामं असणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जशा मोठ्या प्रमाणात सुट्ट्या होत्या, तशा या महिन्यात नाहीत, मात्र काही महत्त्वाच्या तारखांना बँका बंद राहणार आहेत. एकूण ९ ते १० दिवस बँकांचा कामकाज ठप्प राहू शकतो. यात रविवारी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारीच्या नियमित सुट्ट्या तर असतीलच, पण काही विशेष सण आणि स्थानिक उत्सवांमुळे काही राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्या असतील.

१ नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये कन्नड राजोत्सव आणि देहरादूनमध्ये इगास-बग्वाल साजरा होणार असल्याने तेथील बँका बंद राहतील. ५ नोव्हेंबरला संपूर्ण देशभर गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा असल्याने सर्व बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर ७ नोव्हेंबरला शिलाँगमध्ये वंगाला महोत्सवामुळे स्थानिक बँका (banks)बंद राहतील. ८ नोव्हेंबर हा दुसरा शनिवार असल्यामुळे देशभर सुट्टी राहील, तसेच बंगळुरूमध्ये कनकदास जयंतीमुळे तिथेही बँका बंद राहतील. २, ९, १६, २३ आणि ३० नोव्हेंबर हे रविवार असल्याने त्या दिवशीही बँका बंद असतील. याशिवाय, २२ नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे त्या दिवशीही कामकाज होणार नाही.
या सुट्ट्यांचा परिणाम तुमच्या काही महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो. चेक जमा करणे, पासबुक अपडेट करणे, रोख रक्कम काढणे किंवा ठेवणे अशी कामं शाखेत होऊ शकणार नाहीत. मात्र, डिजिटल बँकिंगच्या सुविधा या काळातही सुरू राहतील. त्यामुळे नेट बँकिंग, मोबाइल ॲप किंवा एटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर, बिल पेमेंट आणि इतर व्यवहार नेहमीप्रमाणे करता येतील. जर तुमचा कर्जाचा हप्ता, ठेवीची मॅच्युरिटी किंवा गुंतवणुकीशी संबंधित काम सुट्टीच्या दिवशी येत असेल, तर ते पुढील कामकाजाच्या दिवशी प्रक्रिया होईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सुट्टीच्या दिवशी कोणतेही मोठे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे आपल्या बँकेशी संबंधित कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी आधीच योजना आखणं उत्तम ठरेल. विशेषतः जे लोक बंगळुरू, देहरादून आणि शिलाँगसारख्या ठिकाणी राहतात, त्यांनी स्थानिक सुट्ट्यांची नोंद ठेवावी. एकंदरीत, नोव्हेंबरमध्ये सुट्ट्या तुलनेने कमी असल्या तरी, बँकिंग व्यवहारात अडचण येऊ नये म्हणून वेळेआधी नियोजन करणं आवश्यक आहे. डिजिटल बँकिंगच्या सोयींचा वापर करून तुम्ही सहजपणे व्यवहार पूर्ण करू शकता आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या त्रासापासून वाचू शकता.
हेही वाचा :
१ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम..
शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील पुलाजवळ तरुणाची निर्घृण हत्या…
बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या