अनेक पर्यटकांसाठीरायगड जिल्ह्यातील अलिबाग हे आठवडी सुट्टी व्यतीत करण्यासाठीचं आवडीचं शहर. मात्र याच अलिबाग शहरात एक अतिशय हादरवणारी घटना घडली असून, इथं महिलांच्या, मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलिबाग शहरातील परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन(Minor) मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली.सदर युवकाने मुलीचा आणि तिच्या मित्रासोबतचा फोटो पाहून तिच्या कुटुंबियांना तो दाखवण्याची तसेच सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

या धमकीचा वापर करून आरोपीने फिर्यादीला सतत आपल्या घरी बोलवलं. एके दिवशी घरात बोलावून दरवाज्याला कडी लावून मुलीला बळजबरीने बेडवर ढकललं. तिच्या अंगाला अश्लीलपणे स्पर्श करत तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य आरोपीने केले असल्याची तक्रार अल्पवयीन(Minor) मुलीने अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
पोलिसांमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार ही घटना दि. 1 मे 2024 ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान घडल्याचं सांगण्यात येत असून, दीर्घ काळ आरोपीने पीडित मुलीवर मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचं वृत्त समोर आलं. दरम्यान या प्रकणाची तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली.

अलिबाग शहराला हादरवणाऱ्या या घटनेप्रकरणात अलिबाग पोलीस ठाणे इथं भारतीय दंडसंविधानान्वये 2023 च्या कलम 75,76,77,78,79 तसंच बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा करणाऱ्या पोक्सो कलम 8,12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना मासे यांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा पुढील तपास यंत्रणा करत आहेत.
हेही वाचा :
पतंजलीचे प्रोडक्ट घरबसल्या करता येणार ऑर्डर, मिळणार 10 टक्के सूट..
सात महिन्यांच्या गर्भवती कॉन्स्टेबलने वेटलिफ्टिंगमध्ये 145 किलो वजन उचलून जिंकले पदक
मॅनेजरनं बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला, महिलांचे प्रायव्हेट क्षण कैद केले अन्…