साताऱ्यातील फलटण येथे डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या(suicide) प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आता मृत महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टेम अहवाल समोर आला असून त्यातून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, डॉक्टरच्या शरीरावर कोणतेही बाह्य आघाताचे चिन्ह आढळलेले नाहीत. म्हणजेच मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही आत्महत्या प्रकरण इतक्या चर्चेत येण्याचं प्रमुख कारण म्हणजे डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट. त्यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर बलात्काराचा, तसेच प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला होता.रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा आघाताचे चिन्ह नाहीत. मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी मृत डॉक्टरचा कॉल डिटेल रेकॉर्ड देखील मिळवला असून, त्यात प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांच्यासोबत अनेक वेळा संवाद झाल्याचे तपासात समोर आले आहे.
फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेला हस्ताक्षर अहवाल अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. त्यामुळे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर खरा की खोटा, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने आत्मसमर्पण करण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या मोबाईलमध्ये प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असण्याची शक्यता असल्याने पोलिसांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.
दरम्यान, आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली असून गोपाळ बदनेने पोलिसांना शरणागती पत्करली आहे. दोघांविरुद्ध महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणाने वेग घेतला आहे.मृत डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड (suicide)नोटमध्ये त्यांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचं नमूद केलं आहे. तसेच प्रशांत बनकर याने सतत मानसिक त्रास दिल्याचंही लिहिलं आहे.

घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली, जेव्हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाच्या चौकशीत डॉक्टर आणि पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव असल्याचंही स्पष्ट झालं आहे. प्रशासकीय पातळीवर दोघांकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा :
पुरुष समाजावर होतोय अन्याय…जवळ उभं राहिल्याने काकूंनी केला आरडाओरडा….Video Viral
वन नाईट स्टँडबाबत जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य, म्हणाली…
शिंदे अन् अजित पवारांनी, स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..