योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने ग्राहकांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे. आता पतंजलीची सर्व उत्पादने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन खरेदी करू शकता. आयुर्वेदिक औषधांपासून ते सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ आणि घरगुती वापरातील वस्तूपर्यंत सर्व काही पतंजलीच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळणार आहे. या ऑनलाईन खरेदीवर कंपनीने ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत सूट देण्याची आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.

अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्याप्रमाणेच, आता पतंजलीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही उत्पादनांची खरेदी करता येईल. पतंजलीने आपले अधिकृत संकेतस्थळ www.patanjaliayurved.net
लाँच केले असून, ग्राहक या वेबसाइटवरून किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून हजारो उत्पादने मागवू शकतात. ग्रामीण भागातही ही सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
पतंजलीच्या ऑनलाईन खरेदीवर पंजाब नॅशनल बँक पतंजली क्रेडिट कार्ड किंवा आरबीएल बँक डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. काही उत्पादनांवर डिलिव्हरी चार्जेस देखील लागू होणार नाहीत. त्यामुळे आता साबण, टुथपेस्ट, तूप, पीठ, हर्बल ज्यूस किंवा आयुर्वेदिक औषधं — सगळं काही घरबसल्या मागवता येईल.
ऑनलाईन ऑर्डरसाठी ग्राहकांनी patanjaliayurved.net
या संकेतस्थळाला भेट द्यावी, लॉगिन करून नाव व पत्ता भरावा, नंतर हव्या असलेल्या उत्पादनाला ‘कार्ट’मध्ये अॅड करावे आणि पेमेंट करून ऑर्डर कन्फर्म करावी. काही दिवसांत उत्पादन तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

या नव्या ऑनलाईन सुविधेमुळे पतंजली कंपनीने ग्राहकांसाठी खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर केली आहे. त्यामुळे आता आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांची खरेदी आणखी सोपी आणि परवडणारी ठरणार आहे.
हेही वाचा :
सात महिन्यांच्या गर्भवती कॉन्स्टेबलने वेटलिफ्टिंगमध्ये 145 किलो वजन उचलून जिंकले पदक
मॅनेजरनं बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावला, महिलांचे प्रायव्हेट क्षण कैद केले अन्…
हनीमूनच्या रात्री नवऱ्याला असं सत्य समजलं, सगळं कुटुंब…