पनवेलमध्ये एका फार्महाऊसमध्ये महिलांच्या(women) गोपनीयतेचा भयंकर भंग करणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फिरण्यासाठी फार्महाऊसवर गेलेल्या काही महिलांचे बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा बसवून गुप्त चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीला महिलांनीच रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील धानसर गावातील रियान्स फार्महाऊसवर २५ ऑक्टोबर रोजी काही महिला मित्रमैत्रिणींसह फिरण्यासाठी गेल्या होत्या. रात्री सुमारास, फार्महाऊसचा मॅनेजर मनोज चौधरी याने बाथरूममध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरून स्पाय कॅमेरा बसवला. त्यानंतर महिलांनी अंघोळ करण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी आत गेल्यावर त्यांचे गुप्तपणे व्हिडिओ शूटिंग केले.

महिलांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता आरोपीचा मागोवा घेत रंगेहात पकडले. आरोपी स्पाय कॅमेरावरून अश्लील चित्रण करत असताना महिलांनी(women) तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. तळोजा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.मनोज चौधरीविरुद्ध महिलांचे गुप्त चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता तपास करत आहेत की त्याने यापूर्वीही अशा प्रकारचा गुन्हा केला आहे का.

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, फार्महाऊस, रिसॉर्ट किंवा खासगी राहण्याच्या ठिकाणी जाताना सुरक्षेची खात्री करावी.ही धक्कादायक घटना पुन्हा एकदा दाखवून देते की गोपनीयतेवर होणारे अशा प्रकारचे हल्ले किती गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे प्रवास किंवा सुट्ट्यांदरम्यान राहण्याचे ठिकाण निवडताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ठरते.
हेही वाचा :
हनीमूनच्या रात्री नवऱ्याला असं सत्य समजलं, सगळं कुटुंब…
‘तो रिप्लाय करतोय पण अजून…’ सूर्यकुमार यादवने दिली श्रेयस अय्यरच्या तब्येतीची अपडेट
सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण…