प्राइम व्हिडिओवरील ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोमध्ये नुकताच बेवफाईवर जोरदार खल झाला. करण जोहर आणि जान्हवी कपूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत ट्विंकल खन्नाने केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला, तर जान्हवी कपूरने मात्र वेगळी भूमिका (statement)मांडली.शोमधील ‘दिस ऑर दॅट’ भागात भावनिक आणि शारीरिक फसवणुकीवर चर्चा सुरू झाली. जान्हवी कपूरने स्पष्ट केले की, शारीरिक फसवणूक तिच्यासाठी नाते तोडण्यासारखी गोष्ट आहे. तिच्या मते, दोन्ही प्रकारची फसवणूक चुकीची असली तरी, शारीरिक फसवणूक ही मर्यादा ओलांडणारी आहे.

याउलट, करण जोहर , काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी भावनिक फसवणूक अधिक गंभीर असल्याचे मत मांडले. करणने तर “शारीरिक फसवणूक ही नाते तोडण्याइतकी मोठी गोष्ट नाही,” असे म्हटले. काजोलने दीर्घकाळ नाते टिकवण्यासाठी सुसंगतता प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाची असल्याचे सांगितले, ज्याला (statement)करणनेही दुजोरा दिला.जान्हवीच्या भूमिकेला छेद देत ट्विंकल खन्नाने एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. ती म्हणाली, “आपण ५० च्या दशकात आहोत, ती (जान्हवी) २० वर्षांची आहे… आपण जे पाहिले ते तिने अजून पाहिलेले नाही. रात गयी, बात गयी (रात्र संपली, प्रकरण संपले).” तिच्या या विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
ट्विंकल, काजोल आणि करण यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. अनेक युझर्सनी त्यांच्यावर फसवणुकीला सामान्य ठरवण्याचा आरोप केला. एका युझरने लिहिले, “हे दुःखद आहे की त्यांना इतके फसवले गेले आहे की त्यांनी ते ‘आनंदी लग्नाचा’ भाग म्हणून स्वीकारले आहे.” तर अनेकांनी जान्हवीच्या ठाम भूमिकेचे आणि आत्मसन्मानाचे कौतुक केले.

हेही वाचा :
घरात बोलवलं, बेडवर ढकललं आणि….अल्पवयीन मुलीवर…
पतंजलीचे प्रोडक्ट घरबसल्या करता येणार ऑर्डर, मिळणार 10 टक्के सूट..
सात महिन्यांच्या गर्भवती कॉन्स्टेबलने वेटलिफ्टिंगमध्ये 145 किलो वजन उचलून जिंकले पदक