मशहूर गायक(singer) आणि संगीतकार रघु दीक्षित यांनी आयुष्यात पुन्हा नवीन सुरुवात केली आहे. ५० वर्षांच्या वयात त्यांनी स्वतःपेक्षा १६ वर्षांनी लहान फ्लूटिस्ट आणि गायिका वरिजाश्री वेणुगोपालशी लग्न केले आहे. हे लग्न १४ ऑक्टोबर २०२५ रोजी खासगी सोहळ्यात पार पडले, ज्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झालं आहेत.रघु दीक्षित यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न नृत्यांगना आणि कोरिओग्राफर मयुरी उपाध्याय यांच्याशी २००५ मध्ये झालं होतं, जे २०१९ मध्ये वेगळे झालं. घटस्फोटानंतर रघु दीक्षित आणि वरिजाश्री यांच्यात मैत्री झाली, जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली. दोघांच्या आवडीनिवडी जुळत असल्यामुळे त्यांचे नातं अधिक घट्ट बनलं.

रघु दीक्षित आणि वरिजाश्री यांच्या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली होती. अभिनेत्री यमुना श्रीनिधी यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रघु दीक्षित आणि वरिजाश्री खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते.रघु दीक्षित यांनी पिवळ्या रंगाचा वेष्टी परिधान केला होता, ज्यावर मरून रंगाची किनार होती. वरिजाश्री यांनी केशरी रंगाची साडी परिधान केली होती, ज्यासोबत त्यांनी निळ्या रंगाचा ब्लाउज आणि पारंपरिक लग्नाचे दागिने घातले होते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये, रघु दीक्षित यांनी वरिजाश्रीच्या ग्रॅमी नामांकनाबद्दल एक पोस्ट शेअर केली. त्यांनी वरिजाश्रीला त्यांचीमैत्रीण म्हटले आणि जेकब कॉलियरच्या “अ रॉक समवेअर” या गाण्यावरील(singer) तिच्या कामाचे कौतुक केले, जे सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरी श्रेणीत नामांकित झाले होते.
हेही वाचा :
कुटुंबासोबत चहा घेतला, दार बंद केलं अन् काही वेळात…. भारताच्या स्टार खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!
मला जाऊ द्या ना घरी..अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर डान्स…