बसमधील सीटवरून होणारे वाद हे प्रवाशांमध्ये रोजच्याच घडत असले तरी, कधीकधी हे वाद मारामारी किंवा शारीरिक हाणामारीपर्यंत पोहोचतात. हल्ली असे वाद बरेचजा व्हायरल होताना दिसतात. दिल्लीत तर हे आता अगदीच कॉमन झाले आहे. पण इतर ठिकाणीही हे वाद हमखास बघायला मिळतात. बसमध्ये एका महिले(Aunty) आणि एका पुरूषाला भांडताना दाखवणारा एक अलिकडील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओत दिसतेय की, ती महिला त्या पुरूषाला थोडे दूर जाण्यास सांगते. तथापि, तो रागावतो आणि म्हणतो की तो त्याच्या जागी व्यवस्थित उभा आहे, मग काय अडचण आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती महिला सीटला अगदी टेकून उभी आहे, तर तिच्या समोर एक पुरूष वरच्या आधाराच्या खांबाला धरून उभा आहे. जेव्हा ती महिला त्याला थोडे पुढे जाण्यास सांगते तेव्हा तो पुरूष संतापतो. त्याला त्या महिलेच्या आवाजाचा टोन आवडत नाही असेही दिसून आले (Aunty)आहे.यावर त्या मुलाने उत्तर दिले की महिला बसमध्ये गैरफायदा घेतात आणि त्या सर्व पुरूषांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. हा वाद अगदी पालकांच्या संगोपनापर्यंत वाढलेला दिसून आला आहे. शिवाय, दोघे बराच वेळ एकमेकांना शाब्दिक शिवीगाळ करतानाही दिसले आहेत.

गोंधळामुळे अस्वस्थ झालेले काही प्रवासी त्या दोघांनाही या व्हिडिओत शांत होण्यास सांगतात. एक प्रवासी त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. थोड्या वेळाने, तो माणूस पुढे येऊन उभा राहतो, पण तरीही तो माणूस शांत न राहता भांडण सुरूच ठेवतो. या १ मिनिट ४३ सेकंदाच्या क्लिपमध्ये दोघांमध्येदेखील निरर्थक भांडण दिसून येते. हे सीट किंवा तिकिटाबद्दल नसून दोघेही फक्त बसमध्ये जागा निर्माण करण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतआहेत.@ShoneeKapoor नावाच्या पेजने X वर शेअर केलेला हा व्हायरल व्हिडिओ ४,००,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान सोशल मीडियावर कमेंट करताना अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीदरम्यान महिलांवर ‘Woman Card’ वापरल्याचा आरोप केला, तर काहींनी महिलेची बाजू घेतली.

एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “ही सार्वजनिक वाहतूक आहे, तुमची बैठकीची खोली नाही. सर्वांना जुळवून घ्यावे लागेल.” दुसऱ्याने लिहिले, “पीडित पुरुषाचे कोण ऐकते?” तिसऱ्याने म्हटले, “त्यांनी राईचा पहाड बनवला हा मुळात इतका मोठा मुद्दाच नव्हता”मात्र सध्या कोणत्याही गोष्टीवरून झालेला वाद हा (Aunty)कॅमेऱ्यात कैद होतो आणि असे व्हिडिओ जास्त प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे रस्त्यात एखाद्याशी वाद घालताना चूक किंवा बरोबर आहे की नाही याचा विचार होण्याआधी आपण व्हायरल तर होणार नाही ना? हाच आता विचार आधी करावा लागेल असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हेही वाचा :

वन नाईट स्टँडबाबत जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

शिंदे अन् अजित पवारांनी, स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..

घरात बोलवलं, बेडवर ढकललं आणि….अल्पवयीन मुलीवर…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *