भारताचा स्टार क्रिकेटर (cricketer)श्रेयस अय्यर याला सिडनी येथे झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली. कॅच पकडताना बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. मैदानातून ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर तो बेशुद्ध पडला त्यामुळे त्याला लगेचच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती चिंताजनक असल्याने श्रेयसला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं, बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार श्रेयसची तब्येत बरी जरा असली तरी या दुखापतीमुळे फॅन्स चिंतेत आहे.

श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यावर सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. जवळपास महिन्याभरापूर्वी श्रेयस iQOO India या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या मुलाखतीत अँकरने त्याला प्रश्न विचारला की, चित्रपटाच्या शीर्षकाने तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचे वर्णन करा. यावेळी श्रेयसने ‘अश्वत्थामा’ असं नाव घेतलं. अँकरने त्याला विचारलं की अश्वत्थामाच का? तर यावर श्रेयस म्हणाला की ‘अश्वत्थामा तोच आहे ना की जो कधीच मरत नाही’.

श्रेयस अय्यरला(cricketer) यापूर्वी देखील अनेकदा दुखापतींमुळे क्रिकेटच्या मैदानापासून बरेच महिने दूर राहावे लागले. पण या दुखापतीमधून बरा होत त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेतली. तेव्हा यापूर्वी श्रेयसला कधी कधी दुखापतींचा सामना करावा लागला हे खालील प्रमाणे,सिडनी वनडेमध्ये 34 व्या ओव्हरला हर्षित राणाने चौथा बॉल टाकला. एलेक्स कॅरीने समोरच्या दिशेला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण बॉल बॅटच्या किनाऱ्याला लागून मागच्या दिशेने गेली.

बॅकवर्ड शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरला मागे धावावे लागले, त्याने मागे धावताना एक शानदार झेल घेतला पण जमिनीवर पडल्याने तो जखमी झाला. त्यानंतर त्याला वेदना होत होत्या आणि फिजिओने येऊन त्याला मैदानाबाहेर काढले. रोहित शर्मा (121) आणि विराट कोहली (74) यांनी नाबाद खेळी करत भारताला 9 विकेट्सनी विजय मिळवून दिला. मात्र ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेऊन सीरिज जिंकली.

मंगळवारी सकाळी श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर असून त्याला आयसीयूमधून वाॅर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली होती. आता बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी अय्यरच्या तब्येतीची अपडेट दिली. त्यांनी म्हटले की, ’25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या दुखापत झाली होती, ज्यामुळे प्लीहाला दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता.

जखम लगेचच ओळखण्यात आली आणि उपचार करून रक्तस्त्राव लगेच थांबवण्यात आला. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे आणि तो अजूनही निरीक्षणाखाली आहे. मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी केलेल्या रिपीट स्कॅनमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे आणि आता श्रेयस(cricketer) बरा होण्याच्या मार्गावर आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून, त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल’.

हेही वाचा :

आजचा बुधवार ‘या’ राशींसाठी लकी…

शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश..

मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला; राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *