भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना बुधवार 29 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. कॅनबेरा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने जिंकला. यासह टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 5 बदल करण्यात आले. कॅनबेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचा (matches)टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागणार आहे.

यादरम्यान टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये तब्बल 5 बदल झाले. तसेच नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त असल्याने तो पुढील तीन सामन्यांमधून (matches)बाहेर पडला आहे. बीसीसीआयने सुद्धा नितीश कुमारबाबत एक अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलंय. सूर्यकुमार यादवने प्लेईंग 11 मधील बदल सांगताना सुद्धा नितीशकुमारचा उल्लेख केला. याशिवाय रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह यांना देखील बेंचवर बसवण्यात आलंय.
कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी 20 सामन्यांची सीरिज पार पडणार असून या सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर जिओ हॉटस्टार अँपवर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पार पडेल.

कसं आहे टी 20 सीरिजचं वेळापत्रक?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बुधवार 29 ऑक्टोबर : पहिला सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : शुक्रवार 31 ऑक्टोबर : दुसरा सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :रविवार 2 नोव्हेंबर: तिसरा सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : गुरुवार 6 नोव्हेंबर: चौथा सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : शनिवार 8 नोव्हेंबर : पाचवा सामना
भारताची प्लेईंग 11 :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकिपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड
हेही वाचा :
‘या’ बड्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
लवकरच ‘ट्रू कॉलर’ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय
Wikipedia ला टक्कर देणार ‘हे’ नवं सॉफ्टवेअर…