एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विकिपीडियाला थेट टक्कर देण्यासाठी त्यांनी ‘ग्रोकीपीडिया’ नावाचा(Grokipedia) नवीन एआय-आधारित ऑनलाइन नॉलेज प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. हा प्रकल्प मस्कच्या एआय सिस्टीम “Grok” वर आधारित असून, तो पूर्णपणे एआय चॅटबॉट्सद्वारे चालवला जाणार आहे. विकिपीडियाप्रमाणे सर्वांना संपादनाचा अधिकार नसून, येथे पब्लिक एडिटिंग मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील माहिती अधिक अचूक आणि नियंत्रित राहील, असा दावा मस्क यांनी केला आहे.

मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत “Grokipedia.com” चे वर्जन 0.1 लाईव्ह असल्याची घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, याचे वर्जन 1.0 हे विकिपीडियापेक्षा “दहापट चांगले” असेल. लाँच होताच लाखो लोकांनी ग्रोकीपीडियाला भेट दिली, ज्यामुळे काही काळ वेबसाइट क्रॅश झाली. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर सुमारे ८ लाख एआय-निर्मित लेख उपलब्ध आहेत, तर विकिपीडियावर सध्या सुमारे ७ दशलक्ष मानवी लेख आहेत.
ग्रोकीपीडियाचे(Grokipedia) डिझाईन गडद रंगाच्या थीममध्ये तयार केलेले असून, त्याची फॉन्ट शैली आणि इंटरफेस ChatGPT प्रमाणे वाटतो. लाँचच्या पहिल्याच दिवशी ८.८ लाखाहून अधिक आर्टिकल्स वाचण्यात आले, तर त्याच दिवशी विकिपीडियावर सुमारे ७ दशलक्ष आर्टिकल्स पाहिले गेले.

मस्क यांच्या घोषणेनंतर यूजर्सकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी या प्लॅटफॉर्मवरील चुकीच्या माहितीवर टीका केली, तर काहींनी ग्रोकीपीडियाच्या संकल्पनेचे कौतुक केले. तथापि, सध्या या प्लॅटफॉर्मवरील बरीच माहिती विकिपीडियावरून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील, मस्क यांच्या या नव्या प्रयोगामुळे एआय-आधारित नॉलेज प्लॅटफॉर्मच्या क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
YouTube वर ‘घोस्ट नेटवर्क’चा सापळा! लिंकवर क्लिक करताच धोका
मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी…
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, “ठराविक वयात…”