सोन्याच्या (gold)बाजारात आज पुन्हा एकदा घसरणीचा कल दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढीच्या मार्गावर होते, मात्र दिवाळीनंतर या वाढीला ब्रेक लागल्याचं स्पष्ट होत आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल ₹८२० रुपयांची घसरण झाली असून त्यामुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात दर घसरल्याने अनेकांनी सोने खरेदी केली होती, पण तरीही सध्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.सध्या २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा दर ₹१,२२,४६० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ₹६५६ रुपयांनी कमी होऊन ₹९७,९६८ रुपये झाले आहेत, तर १० तोळा सोन्याचे दर ₹८,२०० रुपयांनी घसरून ₹१२,२४,६०० रुपयांवर आले आहेत.

दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. या प्रकारातील १ तोळ्याचा दर ₹७५० रुपयांनी घसरून ₹१,१२,२५० रुपये झाला आहे. ८ ग्रॅम सोनं आता ₹८९,८०० रुपयांपर्यंत खाली आलं असून यात ₹६०० रुपयांची घसरण झाली आहे. तर १० तोळ्याच्या दरात तब्बल ₹७,५०० रुपयांची घट झाली असून तो ₹११,२२,५०० रुपये झाला आहे.१८ कॅरेट सोन्याचे दरदेखील कमी झाले असून १ तोळ्याची किंमत ₹९१,८४० रुपये आहे. यात ₹६२० रुपयांची घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोनं आता ₹७३,४७२ रुपये, तर १० तोळं सोनं ₹९,१८,४०० रुपये झाले आहे.
विशेष म्हणजे, सध्या सोन्याच्या(gold) दरातील ही घट गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी चांगली संधी ठरू शकते. बाजार तज्ञांच्या मते, जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने आणि सोन्याची मागणी काहीशी कमी झाल्याने ही घसरण दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतही दरांमध्ये चढउतार सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद?
१ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम..
शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील पुलाजवळ तरुणाची निर्घृण हत्या…