आपल्या स्मार्टफोनवर (mobile)आपल्याला दिवसभर अनेक कॉल येत असतात. यातील काही नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह असतात. तर काही कॉल्स अनोळखी नंबरवरून येतात. सतत अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तुम्ही देखील वैतागता का? अनोखळी नंबर कोणत्या व्यक्तीचा आहे, हे शोधण्यासाठी तुम्ही देखील थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घेता का? तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाने एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना सतत अनोळखी नंबरवरून कॉल येतात.

टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाने घेतलेल्या या नव्या निर्णयानंतर आता तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर स्क्रीनवर केवळ तो नंबरच नाही तर त्या व्यक्तीचे नाव देखील दिसणार आहे. जसं ट्रूकॉलर कोणताही कॉल येताच युजर्सना त्या नंबरबाबत माहिती देते. मात्र आता युजर्सना अनोळखी नंबरबाबत माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज लागणार नाही. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाने घेतलेला हा निर्णय युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे.

TRAI म्हणजेच टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि DoT म्हणजेच दूरसंचार विभागने मोबाईल कॉलसंबंधित फसवणूक आणि बनावट कॉल्सना आळा घालण्यासाठी एक नवीन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या नवीन निर्णयानंतर युजर्सना अनोळखी व्यक्तीच्या नंबरसोबत त्याचे नाव देखील स्क्रीनवर दिसणार आहे.युजर्सना स्क्रीनवर तेच नाव दिसणार आहे, जे मोबाइल(mobile) नंबरसाठी KYC मध्ये दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही तर ही सुविधा डिफॉल्ट स्वरुपात अ‍ॅक्टिव्ह असणार आहे. जर गरज नसेल तर युजर्स ही सुविधा डिअ‍ॅक्टिव्हेट देखील करू शकणार आहेत. गेल्यावर्षी या सर्विसची चाचणी मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये करण्यात आले होते.

खरं तर फेब्रुवारी 2024 मध्ये TRAI ने ‘Calling Name Presentation ’ नावाची सर्विस लाँच केली जावी, असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, हे फीचर तेव्हाच ऑन असेल जेव्हा ग्राहक विनंती करणार आहेत. यानंतर DoT ने TRAI ला सल्ला दिला की, ही सुविधा डिफॉल्ट रुपयात युजर्ससाठी उपलब्ध केली जाऊ शकते. तथापि, कोणीही ही सेवा बंद करण्याची विनंती करू शकतो. शेवटी, ट्रायने दूरसंचार विभागाचे मत मान्य केले. दोन्ही विभागांनी आता या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. ज्या लोकांनी Calling Line Identification Restriction सुविधा घेतली असेल तर त्यांचे नाव स्क्रीनवर दिसणार नाही. ही सूट विशेषतः इंटेलिजेंस एजेंसि, व्हीआयपी आणि निवडक व्यक्तींना दिली जाईल. सीएलआयआरसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची सखोल तपासणी केली जाईल.

हेही वाचा :

सकाळी रिकाम्या पोटी प्या हे आयुर्वेदिक पेय, आजार कायमचे राहतील दूर 

उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

इचलकरंजीतील बँक व्यवस्थापकाचा डोक्यात सिमेंटचा नळा घालून खून

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *