दक्षिण आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘थामा’ चित्रपट रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच तिचं वैयक्तिक जीवनही सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. विजय देवरकोंडासोबतच्या तिच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता रश्मिकाने आई(mother) होण्याच्या विषयावर दिलेलं वक्तव्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रश्मिका लवकरच ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी अजून आई (mother)झाले नाही, पण त्या विचारानेच मला आनंद वाटतो. माझी मुलं अजून जन्मालेली नाहीत, तरी मला आतापासूनच त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि जिव्हाळा वाटतो. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मला युद्धही लढावं लागलं तरी मी मागे हटणार नाही.”
ती पुढे म्हणाली, “मी इतकी फिट राहायचं ठरवलं आहे की आवश्यक असेल तर युद्धही लढू शकेन. मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी स्वतःचं वय ठरवलं आहे — २० ते ३० या वयात फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचं, तर ३० ते ४० या वयात काम आणि वैयक्तिक आयुष्याचं संतुलन साधायचं.”

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमधून त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांच्या लग्नाबाबत अनेक चर्चा रंगत असताना, रश्मिकाच्या या भावनिक प्रतिक्रियेने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.
हेही वाचा :
सकाळी रिकाम्या पोटी प्या हे आयुर्वेदिक पेय, आजार कायमचे राहतील दूर
उद्धव ठाकरे गटाचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार
इचलकरंजीतील बँक व्यवस्थापकाचा डोक्यात सिमेंटचा नळा घालून खून