बेंगळुरूच्या एका फुटबॉल स्टेडियममध्ये (stadium)चालू सामन्यात चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. चाकू हल्ला झाल्याने घबराट पसरली असून आता स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे सर्व एका महिलेवरून झालेल्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे. बेंगळुरू युनायटेड आणि स्पोर्टिंग क्लब यांच्यातील केएसएफए सुपर डिव्हिजन लीग सामना सुरू होता. त्यावेळी चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांकडून सांगण्यात आले की हा हल्ला स्थानिक फुटबॉलपटू सत्याला लक्ष्य करून करण्यात आला होता, ज्याचे गेल्या रविवारी उल्लूरमध्ये मॅथ्यू नावाच्या एका पुरूषासोबत एका महिलेवरून भांडण झाले होते.

स्टेडियममधील प्रत्यक्षदर्शींनि घटनेचे वर्णन करण्यात आले. त्यांच्या मते सुमारे सहा पुरुष सत्याचा पाठलाग करत होते. त्यांच्याकडे चाकूंसह शस्त्रे देखील दिसून आली. जी त्यांनी त्यांच्या कपड्यांखाली लपवलेली होती. लोकांच्या मते, ही घटना सामन्याच्या पहिल्या सहामाहीमध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सत्या हल्लेखोरांपासून लपण्यासाठी तळघरामध्ये पळून गेला. तथापि, हल्लेखोरांपैकी एकाने तेथे देखील त्याचा पाठलाग करण्यात आला. शेवटी, केएसएफए अधिकाऱ्यांकडून इशारा दिल्यानंतर हल्लेखोर मागे गेले. पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली परंतु पोलिस येण्यापूर्वीच हल्लेखोर तिथून पळून गेले.

पोलिसांनि सांगितल्यानुसार, सत्या आणि मॅथ्यू यांचा काही एक गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. उल्लूरमध्ये त्यांच्याविरुद्ध यापूर्वी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत का हे ते शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.स्टेडियममधील(stadium) या घटनेमुळे संघाचे अधिकारी खूप भयभीत झाले आहेत आणि त्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. संघाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये ही अशी तिसरी घटना घडली आहे. जी स्पष्ट करते की, सुरक्षा अद्याप पुरेशी नसून कोणीही सहजपणे आत जाऊ शकतं. त्यामुळे ही परिस्थिती धोक्यासारखी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर केएसएफए लवकरच काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. अशी आशा आशिकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :

भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज तीन सामन्यांमधून बाहेर…

डॉक्टर संपदा मुंडेचा हॉटेलमधील शेवटचा व्हिडीओ समोर…

अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी…


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *