सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी तपासात आता एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. डॉ. मुंडे यांनी ज्या हॉटेलमध्ये(hotel) आत्महत्या केली, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून, यात त्यांचे हॉटेलमधील शेवटचे क्षण कैद झाले आहेत.

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गेल्या आठवड्यात शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस(hotel) उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
फलटण येथील डॉक्टर महिलेने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली, त्या हॉटेल मालकाने डॉक्टरने एन्ट्री केल्याचा अन् रूममध्ये जातानाचा सीसीटीव्ही जारी केला#phaltan #satara #फलटण pic.twitter.com/sf8AF2v7GC
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) October 29, 2025
या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्रशांत बनकरला शुक्रवारी पहाटे पुण्यातील एका फार्महाऊसवरून अटक करण्यात आली, तर निलंबित पीएसआय गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा स्वतः पोलिसांना शरण आला. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
आता पोलिसांना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या फुटेजमध्ये डॉ. संपदा मुंडे हॉटेलमध्ये एकट्याच येताना दिसत आहेत. त्या हॉटेलमधील रूम नंबर ११४ मध्ये एकट्याच गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

रात्रीच्या वेळी त्या एकट्याच हॉटेलमध्ये का आल्या? हॉटेलमध्ये येण्यापूर्वी नेमके काय घडले होते? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे घटनेच्या क्रमाचे विश्लेषण करत आहेत, जेणेकरून आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा उलगडा होऊ शकेल.
हेही वाचा :
‘या’ बड्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
लवकरच ‘ट्रू कॉलर’ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय
Wikipedia ला टक्कर देणार ‘हे’ नवं सॉफ्टवेअर…