इचलकरंजी – शहरातील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास गॅस (gas)गिझरचा जबरदस्त स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात आण्णासो आंदरगिसके आणि त्यांची पत्नी मनिषा आंदरगिसके हे गंभीर जखमी झाले असून, दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गिझरमधून अचानक गॅस(gas) गळती झाल्याने स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील रहिवासी दचकले. घराचे मुख्य गेट उडून रस्त्यावर जाऊन पडले, तर घराच्या भिंतींना मोठे तडे गेले असून काही भिंती कोसळल्या आहेत.

या स्फोटामुळे घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रिज, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस गिझरच्या वापरादरम्यान काळजी घेणे आवश्यक असून, या घटनेमुळे सर्वत्र जागरुकता वाढविण्याची गरज आहे.
हेही वाचा :
10 वर्षात करोडपती होणं शक्य… SIP नाही Step up SIP निवडा,महिन्याला किती गुंतवायचे
दोन पत्नी असल्यास पेंशन कोणाला मिळणार लाभ?; नवे नियम जारी
मॅचआधी 17 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सरावादरम्यान नेमकं काय घडलं?