येथील पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत आहे.(drying)तर दुसरीकडे जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुढील काही दिवसांत संपूर्ण नदी पात्र जलपर्णीने व्यापण्याची शक्यता आहे.जलपर्णीमुक्त नदीपात्र राहण्यासाठी महापालिकेने यापूर्वी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही दरवर्षी जलपर्णीचा प्रश्न त्रासदायक ठरत आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे पंचगंगा नदी पाणी गेले काही दिवस प्रवाहित होते.मात्र, सध्या पाण्याचा प्रवाह स्थिर आहे. तर नदी पात्रातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा योजनेच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे. धरणांतून पाणी सोडल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे.पण अद्याप उन्हाळा सुरू झालेला नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती होत असेल तर पुढील तीन महिने पाण्याचे व्यवस्थापन करताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

सध्या पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली असली तरी (drying)शहराला पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे. धरणातून पाणी सोडले आहे. नजीकच्या कालावधीत नदीतील पाण्याची पातळी पुन्हा प्रवाहित होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पाणी प्रवाहित झाल्यानंतर जलपर्णीचे संकटही दूर होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले.

नदीत पाण्याचा प्रवाह स्थिर झाल्यामुळे नागरी क्षेत्रातून सांडपाणी पंचगंगा पात्रात मिसळत (drying)असल्यामुळे जलपर्णी वाढीस पोषक वातावरण निर्माण होत आहे. नदी घाट परिसरात हळूहळू जलपर्णीचे अस्तित्व आतापासूनच जाणवत आहे.यावर ठोस उपाययोजना न झाल्यास पुढील काळात संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने झाकोळले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी महापालिकेचे लाखो रुपये जलपर्णी काढण्यावर खर्ची पडले आहेत. तर लोकसहभागातूनही जलपर्णी काढण्याची मोहीम राबवली जाते. यंदाही जलपर्णीचे संकट त्रासदायक ठरण्याची भीती आहे.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *