गुंतवणुकीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी जमवणं ही एक उपलब्धता मानली जाते. अनेकजण आयुष्यभर करोडपती होण्याचे स्वप्न(millionaire) पाहतात. जरी तुटपुंज्या कमाईमध्ये अगदी एक कोटी रुपये जमवणे हे अवास्तव वाटत असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून एक कोटी रुपये जमा करणे कठीण काम नाही. आर्थिक शिस्त, सातत्य आणि दीर्घकालीन गुंतवणूक या तिहेरी गोष्टींचा मेळ घालून एक कोटी जमवण्याचा टप्पा गाठता येईल.

गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंड सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स म्हणजेच एसआयपी दीर्घकालीन संपत्ती जमवण्यासाठी सर्वात पसंतीचं माध्यम ठरत आहे. जर तुम्हालाही 10 वर्षांत एक कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा असेल तर एसआयपी तुम्हाला नियमितपणे कमी प्रमाणात गुंतवणूक करून लक्ष्य साध्य करता येतं. मात्र स्टेप-अप एसआयपी तुमच्या गुंतवणुकीला गती देऊ शकते आणि कमी कालावधीत एक कोटी रुपयांचे लक्ष्य साध्य करण्यास मदत करु शकते.
अनेक म्युच्युअल फंड संपत्ती निर्मितीला बळ देण्यासाठी ‘स्टेप-अप एसआयपी’ नावाची एक विशेष सुविधा गुंतवणुकदारांना देतात. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनेत निश्चित रक्कम गुंतवत ठेवण्यास स्टेप-अप एसआयपी ठराविक टक्केवारीने गुंतवणूक वाढविण्याची संधी उपलब्ध करुन देते. सर्वसाधारणपणे, स्टेप-अप एसआयपी गुंतवणूकदारांना विद्यमान योजनेत दरवर्षी निश्चित रकमेने गुंतवणूक वाढवण्याची सवलत उपलब्ध करुन देत असल्यानेच स्टेप-अपच्या माध्यमातून कमी कालावधीत आणि कमी रकमेच्या गुंतवणुकीसह देखील एक कोटी साठवण्याचे आर्थिक ध्येय साध्य करता येईल.
स्टेप-अप एसआयपी कसं काम करते आणि 10 वर्षांत एक कोटी रुपये जमा करण्यासाठी या गुंतवणूक पर्यायाचा वापर कसा करता येईल हे समजून घेणं गरजेचं आहे. एसआयपी आणि स्टेप-अप एसआयपीमधील गुंतवणुकीची तुलना करुन योग्य पर्याय निवडता येईल. आवश्यक मासिक गुंतवणूक आणि अंदाजे परतावा किती हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाइन एसआयपी कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. या माध्यमातून(millionaire) तुम्हाला नीट आकडेमोड समजून घेता येईल.एक कोटी रुपये जमा करण्यासाठी, वार्षिक 12% व्याजदराने स्टेप-अप एसआयपीमध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 30 हजार रुपये गुंतवावे लागतील. स्टेप-अप एसआयपीच्या वैशिष्ट्याअंतर्गत, गुंतवणूक दरवर्षी 10% ने वाढवावी लागेल.

गुंतवणूक कशी वाढू शकते हे आकडेवारीसहीत पाहूयात…
एकूण मूल्य: 1,01,23,001 रुपये
गुंतवणुकीची रक्कम: 57,37,488 रुपये
अंदाजे परतावा: 43,85,513 रुपये
कालावधी: 10 वर्षे
स्टेप-अप: 10% प्रतिवर्ष
व्याजदर: 12% प्रतिवर्ष
मासिक गुंतवणूक: रु. 30,000
स्टेप-अप वैशिष्ट्याशिवाय एसआयपी गुंतवणूक कशी वाढता येईल हे पाहूया.
एसआयपीद्वारे एक कोटी रुपये कसे जमवता येतील ते पाहूया
स्टेप-अप वैशिष्ट्याशिवाय एसआयपीमध्ये 30,000 रुपयांची मासिक गुंतवणूक 10 वर्षांत सुमारे 70 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. अंदाजे 12% प्रतिवर्ष परतावा मिळेल या अंदाजाने हा हिशोब मांडण्यात आला आहे.
एकूण मूल्य: 69,70,172 रुपये
गुंतवणुकीची रक्कम: 36,00,000 रुपये
अंदाजे परतावा: 33,70,172 रुपये
कालावधी: 10 वर्षे
व्याजदर: 12% वार्षिक
मासिक गुंतवणूक: 30,000 रुपये
त्याच गुंतवणुकीसह एक कोटी रुपयांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी, तुम्हाला कालावधी 12 वर्षांपेक्षा जास्त वाढवावा लागू शकतो. 30,000 रुपयांची मासिक एसआयपी 12 वर्षांत त्याच व्याजदराने 96,67,565 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, 10 वर्षांत एक कोटी रुपयांचा निधी गाठण्यासाठी तुम्हाला तुमची मासिक रक्कम 45000 रुपयांपर्यंत वाढवावी लागू शकते.
हेही वाचा :
मॅचआधी 17 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सरावादरम्यान नेमकं काय घडलं?
62 व्या वर्षी या अभिनेत्यानं केलं तिसरं लग्न…
ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral