या विश्वाची, या ब्रह्मांडाची (universe)रचना नेमकी कशी झाली, या उत्पत्तीमागे नेमकी कोणती उर्जा महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसली? असे एक ना अनेक प्रश्न आजवर अनेकांच्याच मनात घर करून गेले आहेत. जाणून आश्चर्य वाटेल, पण संशोधकांनाही याच प्रश्नांची उकल करताना काही अशा गोष्टींबाबत माहिती मिळाली, जी पाहून त्यांनाही विश्वास बसेना. गेल्या कैक वर्षांपासून अनेक संशोधकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या याच मुद्द्यावर आधारित एका नव्या विषयानं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. हा विषय म्हणजे ब्रह्मांडाच्या जुळ्या रुपाचा.

आपण ज्या ब्रह्मांडात वावरतो अगदी तसंच आणखी एक ब्रह्मांड (universe)अस्तित्वात असून, त्याची कालमर्यादा मात्र ‘बिग बँग’पूर्वीचा कालखंड सूचित करत आहे. या सिद्धांतानुसार आपण आज ज्या विश्वात वावरतो त्याची उत्पत्ती झाल्यासमयी आणखी एका ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, हुबेहुब याच ब्रह्मांडासारखी. एनल्स ऑफ फिजिक्स’ नावाच्या एका नियतकालिकामध्ये यासंदर्भातील निरीक्षणपपर अहवाल छापून आला असून, आपल्याच ब्रह्मांडाहून अगदी विरुद्ध चालणारंही एक ब्रह्मांड अस्तित्वात आहे.

जिथं युनिवर्स CPT नावाच्या सिद्धांताचं पालन केलं. भौतिकशास्त्राच्या नियमांमध्ये या सिद्धांताला मान्यता आहे मात्र त्यास काही अपवादसुद्धा असू शकतात. लॅथम बॉयल, किरन फिन आणि नील टुरोक यांच्या मते हा सिद्धांत ब्रह्मांडाची निर्मिती करणाऱ्या उर्जा आणि तत्सम कणांपुरता सीमित नसून, सरसकट संपूर्ण ब्रह्मांडासाठीसुद्धा तो लागू होतो.
बिग बँग थिअरी ही विश्वाच्या उत्पत्तीची वैज्ञानिक संकल्पना आहे, ज्यानुसार सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी एका प्रचंड स्फोटामुळे (बिग बँग) विश्वाची निर्मिती झाली. हा स्फोट एका अत्यंत घनतेच्या आणि उष्ण बिंदूपासून सुरू झाला, ज्यामुळे अंतराळ, वेळ, पदार्थ आणि ऊर्जा निर्माण झाली.संशोधकांच्या नव्या सिद्धांतानुसार, आपल्या ब्रह्मांडासोबतच एक दुसरं ब्रह्मांड बिग बँगच्या वेळी निर्माण झालं असावं. CPT (Charge, Parity, Time) सिद्धांत हा भौतिकशास्त्रातील एक मूलभूत तत्त्व आहे, ज्यानुसार विश्वातील कणांचे चार्ज , सममिती आणि काल यांचं एकत्रित संतुलन कायम राहतं.
हेही वाचा :
चुलतीला I Love You म्हटल्याने पुतण्याला आला राग; मारहाण करुन केला खून
डी. के. ए. एस. सी. कॉलेज मध्ये ग्रंथापाल दिन उत्साहात संपन्न…
बँक खातेधारकांनो लक्ष द्या, बँकेने घेतला सर्वात मोठा निर्णय!