देशातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (bank)किमान मासिक शिल्लक रकमेसंदर्भात घेतलेला नवा निर्णय काही तासांतच बदलला आहे. 1 ऑगस्टपासून नव्याने उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यांसाठी मेट्रो शहरांमध्ये 50 हजार रुपये मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची अट बँकेने जाहीर केली होती. मात्र, ग्राहकांच्या तीव्र विरोधानंतर ही मर्यादा घटवून 15 हजार रुपये करण्यात आली.ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी आणि नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने बँकेला हा निर्णय बदलावा लागला.

बँकेने(bank) स्पष्ट केले की, ग्राहकांचा मौल्यवान अभिप्राय मिळाल्यानंतर आम्ही नियमांमध्ये फेरबदल करत आहोत. ग्राहकांचा विश्वास आम्हाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रेरणा देतो.नवीन नियमांनुसार मेट्रो शहरांतील 1 ऑगस्टनंतर खाते उघडणाऱ्या ग्राहकांसाठी मासिक सरासरी शिल्लक मर्यादा 50 हजारांवरून 15 हजार रुपयांवर आणण्यात आली आहे. निमशहरी भागात ही मर्यादा 25 हजारांवरून 7,500 रुपये करण्यात आली. तर, ग्रामीण भागात 10 हजारांवरून ती 2,500 रुपये करण्यात आली आहे.

तथापि, ग्रामीण भाग वगळता मेट्रो आणि निमशहरी भागातील ग्राहकांना 1 ऑगस्टपूर्वीच्या तुलनेत अद्याप जास्त रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे. बँकेच्या या नियमांमुळे काही प्रमाणात तरी खातेदारांचा आर्थिक भार वाढलेलाच आहे.
सॅलरी खातेधारक, पेन्शनधारक, बेसिक सेव्हिंग्स खाते, प्रधानमंत्री जनधन योजना खातेधारक आणि विशेष गरजांच्या ग्राहकांवर ही किमान शिल्लक रकमेची अट लागू नव्हती आणि पुढेही लागू राहणार नाही.
तरीदेखील सर्वसामान्य बचत खातेदारांमध्ये असंतोष पसरला होता. ग्राहकांसाठी मिनिमम बॅलन्स नियम हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. काही तासांत घेतलेला हा मोठा निर्णय आणि त्यानंतरचा बदल हे दाखवते की, ग्राहकांचा दबाव आणि फीडबॅक बँकेच्या धोरणांवर थेट परिणाम करू शकतो.
हेही वाचा :
तरुणांनो तयारीला लागा! राज्यात १५ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात; बसची गाडीला जोरदार धडक…
उरले फक्त काही तास बँकांची काम करून घ्या नाही तर…