गेल्या काही आठवड्यांपासून सोने(Gold) आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. ग्राहकांसाठी ही मोठी चिंता बनली होती. मात्र, आता सुखद बातमी आहे. फक्त 13 दिवसांच्या कालावधीत सोने आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे खरेदीदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गेल्या महिन्यात सोन्याने तब्बल ₹1.32 लाखांचा टप्पा ओलांडला होता, तर चांदीने ₹2 लाखांचा आकडा गाठण्याची तयारी सुरू केली होती. पण आता या दोन्ही धातूंनी मागे वळून पाहिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळी चांदीचा भाव ₹1,50,900 प्रति किलो झाला आहे, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹1,21,620 इतका आहे. अवघ्या 13 दिवसांत सोन्यात ₹10,246 आणि चांदीत ₹25,000 पेक्षा अधिक घसरण झाली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,19,620 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. 23 कॅरेट ₹1,19,140, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,09,570 इतका झाला आहे. 18 कॅरेटचे सोने आता ₹89,710 आणि 14 कॅरेट ₹69,980 प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.चांदीच्या बाबतीतही मोठी घसरण दिसत आहे. एक किलो चांदीचा भाव ₹1,45,600 इतका झाला आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर आणि शुल्क नसल्यामुळे दरात थोडा फरक दिसतो. परंतु देशांतर्गत बाजारात शुल्क, कर आणि मागणी यामुळे दरांमध्ये चढउतार होत असतात.

दिवाळी आणि धनत्रयोदशीसारख्या सणांपूर्वी सोने(Gold) आणि चांदीच्या मागणीत घट दिसली. नफेखोरीसाठी डीलर्स आणि ट्रेडर्सनी विक्री वाढवली, ज्याचा थेट परिणाम दरांवर झाला. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स नुसार, बाजार ‘ओव्हरबॉट झोन’मध्ये पोहोचल्याने गुंतवणूकदारांनी नफा वसूल केला.दरम्यान, जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव काही प्रमाणात कमी झाल्याने सोन्यातील गुंतवणूकही घटली आहे. सोनं हे संकटाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. मात्र, परिस्थिती सुधारल्याने सोन्याचे दर स्थिर होऊ लागले आहेत.

2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल ₹43,091 रुपयांची वाढ झाली होती. 31 डिसेंबर 2024 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹76,162 इतका होता, तर आता तो ₹1,19,253 इतका झाला आहे. चांदीतही ₹59,583 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे — 2024 च्या शेवटी ₹86,017 असलेला भाव आता ₹1,45,600 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.तथापि, मागील 13 दिवसांत झालेल्या घसरणीमुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा.

हेही वाचा :

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र मूल्यांकन भारताला शंभर पैकी 38 गुण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

पहिलं प्रेम सोडून केली क्रिकेटची निवड, 18 व्या वर्षी…; आता ‘इतक्या’ कोटींची मालकीण 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *