जेमिमा रॉड्रिग्सचा जन्म हा 5 सप्टेंबर 2000 रोजी ख्रिश्चन कुटुंबात झाला. जेमिमाचे वडील स्वतः जुनिअर कोच होते त्यामुळे तिला लहानपणापासूनच खेळाची आवड लागली.जेमिमाचे वडील इवान हे तिचे क्रीडा क्षेत्रातील पहिले गुरु होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेट (cricket)खेळायला सुरुवात केली. मुंबईतील आझाद मैदान, ओव्हल ग्राउंड, क्रॉस मॅफन या मैदानांवर तिने क्रिकेटची ट्रेनिंग घेतली.

जेमिमा फक्त क्रिकेटमध्येच नाही तर हॉकीमध्ये सुद्धा अव्वल होती. तिने महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील हॉकी संघाचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं. काहीकाळाने तिला हॉकी आणि क्रिकेटमधील काहीतरी एक निवडण्याचा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तिने क्रिकेट निवडलं.वयाच्या 12 व्या वर्षी मुंबईच्या अंडर 19 संघाकडून जेमिमा रॉड्रिग्सला खेळण्याची संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या देशांतर्गत क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. जेमिमाच्या नेतृत्वात 2024 मध्ये वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने उत्तराखंड संघाला हरवून विजेतेपद जिंकवून दिले होते.
13 फेब्रुवारी 2018 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेमिमाने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुढील एका महिन्यात तिला वनडे संघात पदार्पण करण्याची(cricket) संधी मिळाली. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी मात्र तिला 5 वर्ष वाट पाहावी लागली.जेमिमाने आतापर्यंत 58 वनडे सामन्यात 1725 धावा, 112 टी 20 सामन्यात 2375 धावा आणि 3 टेस्ट सामन्यात 235 धावा खेळल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार जेमिमा रॉड्रिग्सची एकूण संपत्ती ही जवळपास 10 कोटींची आहे. तिच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये मोठा वाटा हा बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, मॅच फी, महिला प्रीमियर लीग कॉन्ट्रॅक्ट देशांर्तगत सामने आणि ब्रँड एंडोर्समेंटचा आहे. विजयानंतर जेमिमाला अश्रू अनावर झाले. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये प्रतिक्रिया देताना सुद्धा जेमिमा रडत होती. ती म्हणाली, ‘भारताचा फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी जेमिमाने महत्वाची कामगिरी केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयानंतर तिने प्रतिक्रिया देत म्हटले, ‘सर्वात प्रथम मी येशूचे आभार मानू इच्छिते. मी हे एकटं करू शकली नसती. मला माहित आहे की त्यांनी मला या कठीण काळातून बाहेर काढले आहे. मी माझ्या आईचे, माझ्या वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकाचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. गेले चार महिने खरोखर कठीण होते, पण ते स्वप्नासारखे वाटते आणि अद्याप पूर्णपणे खरे झालेले नाही’.

हेही वाचा :
उरलेल्या भातापासून बनवा मऊ- जाळीदार उत्तपा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर
युवराज सिंह होणार हेड कोच! आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मोठ्या घडामोडी
यूट्यूबचं ‘सुपर रिझोल्यूशन’ फिचर बाजारात…
