सोशल मिडियावर रोज आपण अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील एका कोर्टातील असल्याचे समोर आले आहे. सोशल मिडियावर रोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच अमेरिकेतील एका पोलिस अधिकाऱ्याचा (Police officer)व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नक्की काय आहे, ते पाहुयात.

सोशल मिडियावर एका पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचे समोर आले आहे. कोर्टाच्या सुनावणीत हा पोलिस अधिकारी बिना(Police officer) पॅंटचाच हजर असल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील मिशिगन राज्यातील असल्याचे म्हटले जात आहे.
NEW: Detroit Police officer Matthew Jackson shows up to a Zoom hearing without pants on.
— Collin Rugg (@CollinRugg) October 29, 2025
Judge Sean B. Perkins: "Officer Jackson. Good morning to you. Can you put your appearance on the record, please?"
Officer Jackson: *Raises hand*
Judge Perkins: "You got some pants on,… pic.twitter.com/hC2BY2Tmqt
कोर्टात सुनावणी सुरू होती. तेव्हा पोलिस अधिकारी ऑनलाइन स्वरूपात सुनावणीला हजर राहिले. हे प्रकरण एका महिलेने दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दलचे होते. न्यायाधीश आणि वकील व पोलिस अधिकारी ऑनलाइन स्वरूपात हजर होते. पोलिस अधिकारी बोलत असताना त्याने त्यांचा कॅमेरा अशा प्रकारे सेट केला की त्यामध्ये ते पूर्णपणे दिसून येतील. यामध्ये त्या अधिकाऱ्याने युनिफॉर्म घातला होता. मात्र त्याने पॅंट घातली नव्हती. हे एका महिला वकिलाच्या लक्षात आले. त्यानंतर तिने हा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा :
आमदार राहुल आवाडे यांच्या पाहणी दौऱ्यात इचलकरंजीचा सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत
डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव…
साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ
